मुंबई, 05 सप्टेंबर : दरवर्षी 5 सप्टेंबर देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा दिवस साजरा होतो. त्यांनी आयुष्यातली 40 वर्ष शिक्षक म्हणून घालवली. तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर कुठले कुठले कोर्सेस आहेत ते जाणून घेऊ नर्सरी टीचर - यासाठी नर्सरी टीचर ट्रेनिंग घ्यावं लागतं. NTT अभ्यासक्रम मुलांच्या पूर्ण विकास आणि वाढीशी संबंधित आहे. उमेदवाराला ट्रेनिंग दरम्यान मुलांच्या शारीरिक, भावनिक, सामाजिक वाढीसाठी काय काय करायचं असतं, हे शिकवलं जातं. या कोर्सचा काळ 1 वर्षांचा असतो.या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना कुठल्याही शाखेतून 50 टक्के मिळवून 12वी उत्तीर्ण हवं. आज लाँच होणार Reliance JioFiber, ‘असं’ करा रजिस्ट्रेशन प्राथमिक शिक्षक - हे शिक्षक 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. यासाठी Diet (District Institute of Education and Training) किंवा D.EL.ED (Diploma in Elementary Education) हा डिप्लोमा कोर्स केला जातो. हा अभ्यासक्रम 2 वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना कुठल्याही शाखेतून 50 टक्के मिळवून 12वी उत्तीर्ण हवं. TGT - टीजीटी (Trained Graduate Teacher)साठी उमेदवार ग्रॅज्युएट आणि बीएड हवा. टीजीटी शिक्षक 6वी ते 10वीच्या मुलांना शिकवू शकतात. खूशखबर! 4 दिवसांनी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, ‘हे’ आहेत आजचे दर PGT - पीजीटी (Post Graduate Teacher) साठी उमेदवार पदव्युत्तर असावा आणि तो बीएडही असावा, पीजीटी शिक्षक 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. भारतात या सर्व पदांसाठी शिक्षक व्हायला उमेदवाराला Teacher Eligibility Test उत्तीर्ण व्हावं लागतं. ही परीक्षा देशाच्या प्रत्येक राज्यात नोकरीसाठी अनिवार्य आहे. या परीक्षेनंतर उमेदवाराला व्हेकन्सीप्रमाणे घेतलेली परीक्षाही उत्तीर्ण व्हावी लागते. नोकरी गेली तरीही काळजी करू नका, ‘असा’ भरा तुमचा EMI लेक्चरर - काॅलेजमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवण्यासाठी कँडिडेट्सला M.A.नंतर UGC नेट (National Eligibility Test) परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा वर्षातून दोनदा असते. शिक्षकी पेशाकडे आदरानं पाहिलं जातं. विद्यार्थ्यांमध्ये सतत राहिल्यानं सकारात्मक उर्जा मिळत राहते. त्यामुळे तुम्ही याचा विचार करू शकता. नव्या वाहतूक नियमांवर नेटकऱ्यांचे भन्नाट मीम्स; पाहा SPECIAL REPORT