JOIN US
मराठी बातम्या / करिअर / वाह रे पठ्ठ्या! तब्बल 87 देशांच्या 1 लाख प्रतिस्पर्धीना पछाडत IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यानं जिंकली जागतिक कोडिंग स्पर्धा

वाह रे पठ्ठ्या! तब्बल 87 देशांच्या 1 लाख प्रतिस्पर्धीना पछाडत IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यानं जिंकली जागतिक कोडिंग स्पर्धा

कलशनं जगातील सर्वात मोठ्या कोडिंग स्पर्धेत (World biggest coding competition) भाग घेत जगभरातून पहिला क्रमांक पटकावला आहे.

जाहिरात

जगभरातून पहिला क्रमांक

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 04 जून: भारत हा असा देश आहे जो इतर देशांच्या तुलनेत विकसनशील असला तरी इथल्या तरुणांमध्ये कमालीचा आत्मविश्वास आणि जग जिंकून घेण्याची ताकद आहे. म्हणून आज जगभरातील टॉप कंपन्यांच्या CEO (Indian CEO of top companies) पदी काही भारतीय आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊ इच्छिणारे असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांचामध्ये जगावर राज्य करण्याची तयारी आहे. असंच एक नाव कलश गुप्ता (Success story of kalash Gupta IIT Delhi). कलशनं जगातील सर्वात मोठ्या कोडिंग स्पर्धेत (World biggest coding competition) भाग घेत जगभरातून पहिला क्रमांक पटकावला आहे. “काय करू वेळेच मिळत नाही”: का उगाच कारणं देता? हातातील वेळ असा मॅनेज करा ना

जगातील सर्वात मोठी कोडींग स्पर्धा जिंकून देशाच्या या सुपुत्राने जगात भारताचा झेंडा उंचावला आहे. खरं तर, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस दरवर्षी जागतिक प्रोग्रामिंग स्पर्धा आयोजित करते. ज्यामध्ये IIT दिल्लीचा विद्यार्थी कलश गुप्ता ‘TCS CodeVita’ सीझन 10 (TCS CodeVita season 10 winner) चा विजेता घोषित करण्यात आला आहे. जिंकल्यावर, कलश गुप्ताला USD 10,000 ची बक्षीस रक्कम देण्यात आली आहे. कलश हा आयआयटी दिल्लीतील कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे.

या स्पर्धेत 87 देशांतील एक लाखाहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. जगातील सर्वात मोठी संगणक प्रोग्रामिंग स्पर्धा म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. दुसरीकडे, Tata Consultancy Services (TCS) ने एक प्रेस रिलीज जारी केले आहे की, कलश नंतर, प्रथम आणि द्वितीय उपविजेते अनुक्रमे चिली आणि तैवानचे आहेत. आयआयटी दिल्लीचे संचालक रंगन बॅनर्जी यांनी कलश गुप्ता यांच्या विजयानंतर त्यांचा गौरव केला आहे. ‘माझाच पगार कमी का?’ परत असा प्रश्न पडणार नाही; Interview च्या टिप्स येतील कामी

टॉप 3 मध्ये येण्याची अपेक्षा

जिंकल्यानंतर कलश गुप्ता म्हणाले की, जेव्हा मी स्पर्धेपासून सुरुवात केली तेव्हा मला कधीच वाटले नव्हते की मी देखील टॉप 3 मध्ये येईन, परंतु हा एक अद्भुत अनुभव आहे. सुरुवातीला, समस्या सोडवण्यास मला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला, परंतु मी इतर काही समस्या सोडवून प्रगती करत असताना, मला माझ्या अंतिम स्थानावर अधिक आत्मविश्वास वाटला आणि मला वाटले की मी पहिल्या 3 मध्ये येईन. CodeVita प्रोग्रामिंगला गेम म्हणून प्रोत्साहन देते आणि सहभागींना त्यांची कौशल्ये एकमेकांविरुद्ध वापरण्यासाठी आणि वास्तविक जीवनातील मनोरंजक आव्हाने सोडवण्यासाठी प्रोत्साहित करते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या