मुंबई, 18 जानेवारी: 2023 मध्ये यूके आणि भारत ‘यंग प्रोफेशनल्स एक्सचेंज प्रोग्रॅम’ सुरू होणार असल्याची घोषणा यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी डिसेंबर (2022) महिन्यामध्ये केली होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. 9 जानेवारी रोजी भारत आणि ब्रिटनच्या एक्सचेंज लेटरवर स्वाक्षरी करून या योजनेची औपचारिक सुरुवात झाली आहे. यंग प्रोफेशनल्स योजनेमुळे भारतातील 18 ते 30 वयोगटातील तीन हजार पदवीधारक तरुणांना दरवर्षी यूकेमध्ये राहण्याची आणि काम करण्याची परवानगी मिळाली आहे. 15 व्या भारत-यूके फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन्स (एफओसी) दरम्यान जारी करण्यात आलेल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या (एमईए) निवेदनात म्हटलं आहे की, 28 फेब्रुवारीपासून या उपक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात होईल. योजनेच्या परस्पर देवाण-घेवाणीच्या स्वरूपामुळे, समान पदांवर असलेले यूकेमधील तरुणदेखील भारतात राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी येऊ शकतील. JEE Main Admit Card 2023: तुमच्या हॉल तिकिट्सवर चुकीची माहिती दिसतेय? टेन्शन नको; सर्वात आधी हे काम करा या उपक्रमाचा पहिला टप्पा तीन वर्षांचा असणार आहे. मार्च महिन्यामध्ये भारतीय तरुणांची पहिली बॅच यूकेला जाईल, असं भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी लंडनमधील भाषणात सांगितलं. दोन्ही राष्ट्रांनी संबंधित योजनेच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर झालेल्या समारंभात हे भाषण झालं. दोराईस्वामी यांनी सांगितलं की, मार्चमधील रोलआउटपूर्वी अनेक प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. सरकारी नोकरीची ही संधी सोडून कसं चालेल? तब्बल 1,80,000 रुपये पगार; करा अप्लाय भारत-यूके यंग प्रोफेशनल स्कीमचे पात्रता निकष मनीकंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय उमेदवारांना आपल्या बँक खात्यामध्ये विशिष्ट रक्कम शिल्लक दाखवावी लागेल. जेणेकरून यूकेमध्ये असताना ते स्वत:चा उदरनिर्वाह करू शकतील हे सिद्ध होईल. भारतीय तरुणांकडे किती रक्कम असली पाहिजे हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, यूकेमध्ये राहणाऱ्या इतर राष्ट्रांतील तरुणांकडे सुमारे 2,530 पाउंड म्हणजेच 2.50 लाख रुपये शिल्लक असावी, अशी अट आहे. दुसरा पात्रता निकष असा आहे की, अर्जदार पदवीधारक असले पाहिजेत आणि त्यांना 18 वर्षांहून लहान मूल नसावं किंवा अशा मुलाची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर नसावी. कारण, उमेदवारांना यूकेच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेचा (NHS) लाभ मिळणार असला तरीही त्यांना सार्वजनिक आरोग्य निधीचा लाभ मिळणार नाही.
भारत आणि युनायटेड किंग्डम यांच्यातील मायग्रेशन व मोबिलिटी संबंधित सामंजस्य करारावर मे 2021 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती. या करारामुळेच यंग प्रोफेशनल्स स्कीम तयार करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये (2022) बाली येथे झालेल्या G20 शिखर परिषदेत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर ही स्कीम लाँच करण्याची घोषणा केली होती. दोन्ही राष्ट्रांच्या दृष्टीने ही योजना एका नवीन युगाची नांदी ठरणार आहे. दोन्ही राष्ट्रांनी मिळून एक असा उपक्रम सुरू केला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांतील तरुणांना महत्त्वपूर्ण आर्थिक गुंतवणूक न करता किंवा नोकरीची ऑफर नसताना तात्पुरत्या स्वरुपात दुसऱ्या देशात राहून काम करता येईल.