देशात बेरोजगारीचं भीषण वास्तव
मुंबई, 02 जानेवारी: देशात बेरोजगारीचा मुद्दा नेहमीच कळीचा ठरत असतो. इरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना नेहमीच धारेवर धरलं जातं मात्र या मुद्य्यांची भीषणताही तशीच आहे. देशात बेरोजगारी वाढत चालली आहे. दर महिन्याला बेरोजगारीचा आकडा वाढत चालला आहे. हेच सांगणारा एक अहवाल आता समोर आला आहे. ज्यानुसार डिसेंबर 2022 मध्ये बेरोजगारीचा दर हा तब्बल 8.3 टक्के इतका आहे. डिसेंबर महिब्यात बेरोजगारीनं रेकॉर्ड ताडले आहेत. नक्की काय सांगतोय हा अहवाल जाणून घेऊया. Maharashtra Megabharti: नवीन वर्ष, नव्या संधी; राज्यातील तरुणांसाठी ‘या’ विभागांमध्ये हजारो नोकऱ्या; संपूर्ण माहिती एका क्लिकवर देशातील बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत आहे. भारतात डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा बेरोजगारीचा दर 8.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 16 महिन्यांतील हा उच्चांक आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये हा आकडा 8 टक्के होता. आकडेवारीनुसार, शहरी भागातील बेरोजगारीचा दर डिसेंबरमध्ये 10.09 टक्क्यांवर पोहोचला, जो मागील महिन्यात 8.96 टक्क्यांवर होता. त्याच वेळी, ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 7.55 टक्क्यांवरून 7.44 टक्क्यांवर आला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने आपल्या अहवालात CMIE चे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांचा हवाला देत म्हटले आहे की, “आकड्यांपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिसेंबरमध्ये रोजगाराचा दर 37.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो जानेवारी 2022 नंतरचा उच्चांक आहे.” राज्यातील ग्रॅज्युएट्ससाठी थेट अधिकारी होण्याची संधी; MPSC कडून तब्बल 1037 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अप्लाय 2024 च्या निवडणुकीपूर्वी, पंतप्रधान मोदींसमोरील सर्वात मोठे आव्हान उच्च महागाई रोखणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हे असेल. महागाई, बेरोजगारी आणि फुटीचे राजकारण या मुद्द्यांवर काँग्रेस ‘भारत जोडो’ यात्रा काढत आहे. या मुद्द्यांवर जनतेला एकत्र आणण्याच्या उद्देशाने सप्टेंबर महिन्यात कन्याकुमारी येथून हा प्रवास सुरू करण्यात आला, जो जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरपर्यंत पोहोचेल. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO) ने नोव्हेंबरमध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर तिमाहीत बेरोजगारीचा दर मागील तिमाहीत 7.6 टक्क्यांच्या तुलनेत 7.2 टक्क्यांवर आला आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये हरियाणामध्ये बेरोजगारीचा दर 37.4 टक्क्यांवर गेला, त्यानंतर राजस्थानमध्ये 28.5 टक्के आणि दिल्लीत 20.8 टक्के वाढ झाली आहे.