अशी असेल PET
मुंबई, 16 डिसेंबर: RRB ग्रुप D निकाल 2022, RRB गट D शारीरिक कार्यक्षमता चाचणी 2022-23: सुमारे 1 कोटी उमेदवार रेल्वेतील गट D पदांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता ही प्रतीक्षा संपणार आहे. RRB ग्रुप D च्या निकालाची तारीख घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे एक कोटी उमेदवाराचं नशीब आता या निकालावर आहे. आपण निकालानंतर पुढे काय? निकालानंतर शारीरिक परीक्षा, कागदपत्रं तपासणी आणि मेडिकल टेस्ट होणार आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यासाठीचे काही पात्रतेचे निकष सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. RRB ग्रुप D CBT परीक्षेनंतर पुढे काय? शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) RRB ग्रुप डी (लेव्हल-1) मध्ये एकच स्टेज टेस्ट असेल. दुसरा CBT नसेल. गट डी परीक्षा उत्तीर्ण होणार्या उमेदवाराला शारीरिक क्षमता चाचणी म्हणजेच पीईटी उत्तीर्ण करावी लागेल. ना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट; PCMC मध्ये ‘या’ पदांसाठी थेट भरती; दर सोमवारी होणार मुलाखत शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) निकष
पुरुष उमेदवारांसाठी | महिला उमेदवारांसाठी |
---|---|
35 किलो वजन | 20 किलो वजन |
100 मीटरचे अंतर 2 मिनिटांत कापावे लागेल. | 2 मिनिटांत 100 मीटर धावावे लागेल. |
एक किलोमीटर 4 मिनिटे 15 सेकंदात धावावे लागेल. | एक किलोमीटर 5 मिनिटे 40 सेकंदात धावावे लागेल. |
आरआरबी ग्रुप डी दस्तऐवज पडताळणी RRB गट डी भरती प्रक्रियेचा तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणीचा असेल. जे उमेदवार शारीरिक कार्यक्षमता चाचणीत पात्र ठरतील त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. कागदपत्र पडताळणीसाठी, रिक्त पदांपेक्षा दुप्पट उमेदवारांना आमंत्रित केले जाईल. गुणवत्ता आणि पर्यायाच्या आधारे कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. Success Story: त्रास देणाऱ्या पती आणि सासरच्या लोकांच्या नाकावर टिच्चून झाली IAS; असं बदललं स्वतःचं नशीब वैद्यकीय चाचणी RRB गट डी निवड प्रक्रियेतील चौथा आणि अंतिम टप्पा वैद्यकीय चाचणीचा असेल. यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. यामध्ये डोळ्याच्या दृष्टीपासून इतर अनेक चाचण्या होतील. RRB गट D पदांसाठी नेमणूक कधी होईल? रेल्वे भरती बोर्डाने 3 ऑक्टोबर रोजी एक आदेश जारी केला होता. त्यात एप्रिल 2023 पर्यंत रेल्वेच्या 17 झोनमध्ये एक लाख 52 हजार 713 रिक्त पदे पूर्ववत करण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. फेब्रुवारीपर्यंत शारीरिक कार्यक्षमता चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीची प्रक्रिया पूर्ण करून एप्रिलमध्ये रुजू होण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.