नवी दिल्ली, 15 जुलै : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट रॅंकिंग फ्रेमवर्क 2022 (NIRF) नुकतंच जाहीर केलं आहे. त्यामुळे इयत्ता 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं खूप सोपं जाईल. नवीन यादीनुसार विद्यार्थी टॉप 10 मेडिकल कॉलेजमध्ये (Top 10 Medical Colleges in India) प्रवेश घेऊ शकणार आहेत. नवीन यादीनुसार आम्ही सर्वोत्तम 10 मेडिकल कॉलेजेसची यादी येथे देत आहोत. मेडिकलचा अभ्यास करून करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही यादी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. एनआयआरएफ रॅकिंग 2022 : टॉप 10 मेडिकल कॉलेजेस 1 - ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्ली 2 - पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, चंडीगड 3 - ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज, वेल्लोर 4 - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस, बंगळुरू 5 - संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लखनौ 6 - अमृता विश्व विद्यापीठम्, कोईमतूर 7 - बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी 8 - जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, पुदुच्चेरी 9 - किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनौ 10 - कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मणिपाली
सर्दीसारखं आता कोरोनासाठी नेझल स्प्रे, किती आहे किंमत आणि कोण वापरु शकतं?
प्रत्येक विद्यार्थ्याच्या करिअरच्या दृष्टीनं इयत्ता 10 वी आणि 12 वी ची परीक्षा आणि या परीक्षांमध्ये मिळालेले मार्क्स अत्यंत महत्त्वाचे असतात. या मार्क्सवर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशी ठरत असते. सध्याच्या काळात इंजिनीअरिंग आणि मेडिकल या दोन शाखांकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल असल्याचं दिसून येतं. यापैकी कोणत्याही शाखेला प्रवेश घेण्यासाठी इयत्ता 12 वीत उत्तम मार्क असणं आवश्यक आहे. मेडिकल क्षेत्रात करिअर करणं हे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. यासाठी विद्यार्थी विशेष परिश्रम घेत असतात. परंतु, देशातली कोणती विद्यापीठं मेडिकलच्या शिक्षणासाठी टॉप आहेत, याविषयी विद्यार्थ्यांना बऱ्याचदा माहिती नसते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट रॅंकिंग फ्रेमवर्कची घोषणा केली आहे. 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली; आता या दिवशी होईल परीक्षा या यादीत वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या सर्वोत्तम दहा विद्यापीठांचा समावेश आहे. या यादीमुळे संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार विद्यापीठाची निवड करता येणार आहे. वैद्यकीय क्षेत्र गेल्या काही वर्षांपासून वेगानं विस्तारत आहे. आजही अनेक भागांत उत्तम वैद्यकीय सुविधांची गरज असल्याने या क्षेत्रात भरपूर संधी आहेत. तसंच स्पेशलायझेशनला विशेष महत्त्व असल्यानं विद्यार्थी या अनुषंगानेदेखील या यादीतल्या विद्यापीठाची निवड करू शकतात. तसंच त्यांना पुढील काळात संशोधन क्षेत्रातही यामुळे संधी मिळवता येऊ शकते.