प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे
मुंबई, 08 फेब्रुवारी: गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी PPP मोडमध्ये 100 नवीन सैनिक शाळा (Army School) सुरू करण्याची घोषणा केली होती. या अंतर्गत सरकारी, खाजगी आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सैनिक शाळा उघडल्या (New Army schools in India) जाणार आहेत. सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी सैनिक स्कूलच्या www.sainikschool.ncog.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. सरकारच्या म्हणण्यानुसार, इयत्ता 6 वी पासून सुरू होणाऱ्या या सैनिक शाळा प्रवेशामध्ये 2022-23 च्या सत्रात 5000 मुलांना प्रवेश दिला जाईल. पीपीपी मॉडेलवर सुरू होणाऱ्या या शाळा सध्याच्या सैनिक शाळांप्रमाणे काम करतील. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे सरकारने सैनिक शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची तयारी केली आहे. या अंतर्गत सैनिक स्कूल सोसायटी ई-समुपदेशन आयोजित करण्यासाठी स्वयंचलित प्रणाली विकसित करत आहे. देशभरात सुरू होणाऱ्या नवीन शाळांना ही नवी प्रणाली लागू होणार आहे. सध्या देशात 33 सैनिक शाळा आहेत. Jobs in Mumbai: बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत काही पदांसाठी होणार भरती अशा पद्धतीनं मिळणार प्रवेश संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सैनिक स्कूल सोसायटी पात्रतेसाठी निर्धारित गुणांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ईमेल किंवा मोबाइल क्रमांकावर लिंक पाठवली जाईल. यासाठी www.sainikschool.ncog.gov.in या वेबसाइटवर दिलेल्या लिंकद्वारे विद्यार्थ्यांना नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्याच लिंकवरून व्हेरिफिकेशनही केले जाईल. विद्यार्थी निवडू शकतील शाळा विद्यार्थ्यांना वाटपासाठी 10 शाळा निवडण्याचा पर्याय मिळेल. यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा दर्जा आणि शाळांची निवड यानुसार तयार केलेल्या प्रणालीद्वारे प्रवेश दिला जाईल. ई-समुपदेशन पोर्टलद्वारे निकाल घोषित केले जातील. अपेक्षेप्रमाणे शाळेचे वाटप न झाल्यास विद्यार्थ्यांना समुपदेशनात फेरी-2 चा पर्यायही उपलब्ध असेल. फेरी-1 मधील उर्वरित जागा राऊंड-2 मध्ये भरल्या जातील.