NEET PG Admit Card डाउनलोड
मुंबई, 09 मे: पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET PG) 21 मे 2022 रोजी घेतली जाईल. त्यासाठी प्रवेशपत्राची प्रतीक्षा आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) द्वारे जारी केले जाईल. परीक्षेला बसण्यासाठी अर्ज करणारे विद्यार्थी nbe.edu.in आणि natboard.edu.in या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. मात्र NEET PG 2022 परीक्षेचे प्रवेशपत्र कधी जारी केले जाईल याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. परीक्षेची तारीख जवळ येते आहे त्यामुळे आता NEET PG 2022 प्रवेशपत्र (How to download NEET PG 2022 admit card) लवकरच जारी केले जातील अशी माहिती मिळतेय. नक्की कसा असावा Professional Resume? कोणत्या गोष्टी Add करणं आवश्यक? वाचा
व्हायरल झालं होतं बनावट परिपत्रक
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने म्हटले आहे की यावर्षी NEET-PG परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नाही आणि ती 9 मे च्या नियोजित तारखेला घेतली जाईल. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या नावाने जारी करण्यात आलेली नोटीस ‘बनावट’ असून ही परीक्षा आता 9 जुलै रोजी होणार असल्याचे त्यात म्हटले आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन फॉर मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने देखील त्यांच्या नावाने जारी केल्या जाणार्या “बनावट माहिती” बद्दल सावध राहण्याचा इशारा दिला आहे. आता ऑफिसमध्ये बॉससमोर बिनधास्त मांडा तुमचे विचार; या टिप्समुळे वाढवा Confidence असं करा Admit Card डाउनलोड सर्वप्रथम NEET nbe.edu.in किंवा natboard.edu.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा. प्रवेशपत्र डाउनलोड लिंकवर क्लिक करा किंवा प्रथम लॉग इन करा आणि नंतर लिंक शोधा. आवश्यक लॉगिन तपशील प्रविष्ट करा. प्रवेशपत्र पाहण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा. ते डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.