JOIN US
मराठी बातम्या / करिअर / कॅन्सरमुळे वडिलांचा मृत्यू, जीवनातील संघर्षादरम्यान मुस्लीम विद्यार्थिनीने संस्कृतमध्ये जिंकली 5 मेडल्स

कॅन्सरमुळे वडिलांचा मृत्यू, जीवनातील संघर्षादरम्यान मुस्लीम विद्यार्थिनीने संस्कृतमध्ये जिंकली 5 मेडल्स

लखनऊ युनिव्हर्सिटीतील (Lucknow University) मुस्लीम विद्यार्थिनी गझाला हिला ‘बेस्ट संस्कृत स्टुडंट’ (Best Sanskrit Student) म्हणून पाच गोल्ड मेडल (Gold medal) मिळाली आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 11 फेब्रुवारी: लखनऊ युनिव्हर्सिटीतील (Lucknow University) मुस्लिम विद्यार्थिनी गजाला हिला ‘बेस्ट संस्कृत स्टुडंट’ (Best Sanskrit Student) म्हणून पाच गोल्ड मेडल (Gold medal) मिळाली आहेत. लखनऊतील निशातगंजमध्ये (Nishatganj) एका खोलीच्या घरात राहणाऱ्या गजालासाठी हे यश मिळवणं सोपं नव्हतं. तिचे वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. त्यांचा कॅन्सरनं (Father Died of Cancer) मृत्यू झालेला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर गजालाच्या दोन भावांनी शिक्षण सोडून गॅरेजमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिच्या एका बहिणीनंसुद्धा भांड्याच्या दुकानात नोकरी पत्करली. गजालाची आई आणि भावंडांनी तिची प्रत्येक गरज पूर्ण सतत अभ्यासासाठी प्रोत्साहन दिलं. आता गजालाला लखनऊ युनिव्हर्सिटीमध्ये सर्वोत्कृष्ट संस्कृत विद्यार्थिनी म्हणून पाच गोल्ड मेडल मिळाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला आनंद झाला आहे. लखनऊ युनिव्हर्सिटीत नोव्हेंबरमध्ये झालेल्या दीक्षांत समारंभात (Convocation Ceremony) गजालाच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी कोविड-19 मुळे मोजक्याच विद्यार्थ्यांना मेडल्स देण्यात आली होती. आता गुरुवारी (10 फेब्रुवारी 2022) फॅकल्टी लेव्हलवर (Faculty Level) आयोजित केलेल्या एका पदक वितरण समारंभात गजालाला मेडल्स देऊन गौरवण्यात आलं. युनिव्हर्सिटीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये (Cultural events) संस्कृत श्लोकांचं पठण करण्यासाठी गजाला प्रसिद्ध आहे. एक प्राध्यापक होऊन जगभरात शांतता, एकता आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश पोहोचवण्याची गजालाची इच्छा आहे. हे वाचा- प्रियकराची ढाल बनली, नवऱ्यालाही जुमानलं नाही; पोलीस ठाण्यातच रंगला फॅमिली ड्रामा गजाला दहावीत असताना तिच्या वडिलांचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं. आता ती ग्रॅज्युएट आहे आणि तिने हिंदी (Hindi), इंग्रजी (English), उर्दू (Urdu), अरबी (Arabi) आणि संस्कृत (Sanskrit) या पाच भाषांत प्रावीण्य मिळवलं आहे. आपल्याला मिळालेली मेडल्स ही फक्त एकटीची नाहीत, असं गजालाचं म्हणणं आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबाला तिनं यशाचं श्रेय दिलं आहे. तिच्या शिक्षणासाठी शादाब आणि नायाब या दोन भावांनी लहान वयात शिक्षण सोडून काम सुरू केलं. घरखर्च भागवण्यासाठी गजालाची बहीण यास्मिन एका भांड्याच्या दुकानात काम करते तर तिची आई नसीर बानो तिची काळजी घेते. त्यामुळे मला मिळालेले पाच मेडल आम्हा पाचही जणांचे आहेत, असं गजाला म्हणाली. हे वाचा- अरे बाप रे! आठवलेंचा शशी थरूरना इंग्रजीबद्दल सल्ला; स्पेलिंगच्या चुकाही काढल्या प्राथमिक शाळेत (Primary School) असताना गजालाला संस्कृतची आवड निर्माण झाली होती. इयत्ता पाचवीमध्ये असताना संस्कृत शिक्षिका मीना मॅम यांनी तिला संस्कृत शिकवलं होतं. यानंतर आर्य कन्या इंटर कॉलेजमधील (Arya Kanya Inter College) संस्कृतच्या शिक्षिका अर्चना द्विवेदी यांनी तिला संस्कृत विषय शिकवला. नगमा सुलतान यांनी करामत हुसैन मुस्लिम गर्ल्स पीजी कॉलेजमध्ये गजालाला संस्कृत शिकवलं. तर, लखनौ युनिव्हर्सिटीमध्ये प्रयाग नारायण मिश्रा यांनी तिला संस्कृत विषय शिकवला. गजालाला आता वैदिक साहित्यात (Vedic literature) पीएचडी (PhD) करण्याची इच्छा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या