मुंबई विद्यापीठ (University of Mumbai)
मुंबई, 05 ऑक्टोबर: परीक्षा जशा जशा जवळ येऊ लागतात तसं आप्ल्यालाही वाटू लागतं की परीक्षा रद्द व्हाव्यात किंवा पोस्टपोन व्हाव्यात. त्यात जर परीक्षा दिवाळी सारख्या सणांच्या वेळी आल्यात तर डोक्याला तापच. पण मुंबई विद्यापीठानं मात्र या बाबतीत सर्व विद्यार्थ्यांची मनं जिंकली आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या विनंतीनंतर, विद्यापीठाने दिवाळीनंतर पाचव्या सत्राची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी परीक्षा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार होत्या. किमान पाच शहरातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी एमयूला पत्र लिहून असा दावा केला होता की, त्यांच्याकडे लाँग-फॉर्म पॅटर्नमधील लेखी परीक्षेसाठी पुरेसा वेळ आणि सराव नाही. त्यांनी सांगितले की त्यांनी सलग दोन वर्षे बहु-निवडी प्रश्नांसह ऑनलाइन परीक्षा दिली आहे. त्यामुळे, त्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अतिरिक्त वेळ हवा आहे ज्यात व्यक्तिनिष्ठ प्रश्नही असतील. “परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने एका बैठकीत पाचवीच्या सत्राच्या परीक्षा दिवाळीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना दिवाळी संपण्यापूर्वी परीक्षेच्या नवीन तारखांची माहिती दिली जाईल,” असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने सांगितले. एकदा अधिकाऱ्यांनी परीक्षेचे वेळापत्रक शेअर केल्यानंतर, विद्यार्थी ते अधिकृत वेबसाइट - mu.ac.in वरून डाउनलोड करू शकतील. 12वी असो की ग्रॅज्युएट तब्बल 64,000 रुपये महिना पगाराची नोकरी; ‘या’ नॅशनल इन्स्टिटयूटमध्ये करा अप्लाय गेल्या महिन्यात, मुंबई विद्यापीठाने 26 आणि 27 ऑगस्ट रोजी झालेल्या प्री-पीएचडी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला. एकूण 4,785 उमेदवार परीक्षेला बसले, त्यापैकी 2,591 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेची उत्तीर्णतेची टक्केवारी 54.14 इतकी आहे. चार विद्याशाखांमध्ये 79 विषयांसाठी ऑनलाइन प्रवेश घेण्यात आले. या परीक्षेत विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील 1171 विद्यार्थी, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील 468 विद्यार्थी आणि मानवता विद्याशाखेतील 571 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इंटरफेकल्टीमधील आणखी 381 विद्यार्थ्यांनीही परीक्षा उत्तीर्ण केली. Success Story: रूम भाड्याने देऊन काय करणार? असं म्हणायचे लोकं; आला राग अन् उभी केली 8,000 कोटींची कंपनी दरम्यान, जुलैच्या सत्रासाठी मुंबई विद्यापीठाच्या दूर व खुल्या संस्थेतील तब्बल 24 अभ्यासक्रमांचे प्रवेश अद्याप सुरू आहेत. त्यांच्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर आहे. विद्यापीठाने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि जनसंपर्क या विषयातील एमए अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश सुरू केला आहे. या तीन नवीन अभ्यासक्रमांना नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी मान्यता दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे, मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (MMS) आणि मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स (MCA) अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदतही 10 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.