JOIN US
मराठी बातम्या / करिअर / धक्कादायक! देशात निम्म्याहून अधिक ग्रॅज्युएट्स Unskilled; पात्र असूनही अनेक पदवीधरांना नाही Jobs; इंडिया स्किल रिपोर्टमध्ये खुलासा

धक्कादायक! देशात निम्म्याहून अधिक ग्रॅज्युएट्स Unskilled; पात्र असूनही अनेक पदवीधरांना नाही Jobs; इंडिया स्किल रिपोर्टमध्ये खुलासा

निम्म्याहून अधिक उमेदवारांकडे स्किल्सच नाहीत अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. इंडिया स्किल रिपोर्ट 2022 (India Skills Report 2022) मध्ये यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे.

जाहिरात

इंडिया स्किल रिपोर्ट 2022मधील माहिती जाणून घ्या

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 13 डिसेंबर: भारतात सर्वात जास्त संख्या तरुणांची आहे असं आपण म्हणतो. मात्र आपल्याच देशात या तरुणांसाठी रोजगार (Jobs in India) उपलब्ध नाहीत हेही आपल्याला माहिती आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात बेरोजगारीची समस्या (Problem of Unemployment) वाढत चालली आहे. याउलट शिक्षणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. अधिकाधिक तरुण तरुणी उच्चशिक्षित होत आहेत. मात्र या युलनेत त्यांना मिळणाऱ्या जॉब्सचं (Job opportunities in India) प्रमाण कमी होत चाललं आहे. तर निम्म्याहून अधिक उमेदवारांकडे स्किल्सच नाहीत अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. इंडिया स्किल रिपोर्ट 2022 (India Skills Report 2022) मध्ये यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. भारतात जरी सरकारकडून किंवा विविध संस्थनांकडून स्किल इंडिया (Skill India) या मोहिमेअंतर्गत स्किल देण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. तरीही अजूनही निम्म्याहून उमेदवारांकडे जॉब करण्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स (Skills for getting Job) नाहीत ही बाब या रिपोर्टमधून समोर आली आहे. पदवी असून, शिक्षण असूनही अजून निम्मेही उमेदवार रोजगारक्षम (Employable) नाहीत अशी धक्कदायक माहितीही समोर आली आहे. India Skill Report 2022 नुसार भारतात 46.2 टक्के उमेदवार हे रोजगारक्षम आहेत म्हणजेच ज्यांच्याकडे पदवी आहेत आणि जॉबसाठी तयार आहेत. हाच आकडा 2021 मध्ये 45.9 टक्के इतका होता. मात्र कोरोनाच्या आधी म्हणजे 2019 मध्ये हा आकडा 47.38 टक्के इतका होता जो आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा होता. म्हणजेच 2019 मध्ये अधिक उमेदवार हे रोजगारक्षम होते. मोठी बातमी! Facebook Meta भारतातील तब्बल 1 कोटी लहान व्यवसायिकांना देणार ट्रेनिंग; कसं ते वाचा कोणत्या क्षेत्रात किती रोजगारक्षम उमेदवार विशेष म्हणजे सर्वात जास्त रोजगारक्षम उमेदवार ही BE, B.Tech किंवा MBA पर्यँतशिक्षण पूर्ण करणारे आहेत. ज्या उमेदवारांनी BE किंवा B.Tech पूर्ण केलं आहे असे देशात तब्बल 55.15 टक्के उमेदवार हे रोजगारक्षम आहेत. तर त्यापाठोपाठ 55.09 टक्के MBA पूर्ण केलेले उमेदवार हे रोजगारक्षम आहेत. तसंच पॉलिटेक्निक आणि MCA पर्यंत शिक्षण घेतलेले उमेदवार हे सर्वात कमी रोजगारक्षम आहेत. 21.43 टक्के पॉलिटेक्निक पूर्ण केलेलं उमेदवार रोजगारक्षम आहेत तर 29.30 टक्के MCA पूर्ण केलेलं उमेदवार रोजगारक्षम आहेत. या राज्यांमध्ये सर्वात जास्त रोजगारक्षमता रोजगार देण्याच्या बाबतीत काही राज्यांचा अव्वल क्रमांक लागतो. देशात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, दिल्ली, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात आणि हरियाणा या राज्यांचा रोजगारक्षमतेत पहिल्या दहा राज्यांमध्ये क्रमांक लागतो. यापैकी पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्राचा (Maharashtra high employability rate) नंबर लागतो. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि केरळचा नंबर लागतो. रोजगाराची साधनं उपलबध करून देण्यात संपूर्ण देशात केरळ राज्याचा पहिला नंबर लागतो. Engineer उमेदवारांनो, हा गोल्डन चान्स सोडू नका; Boeing कंपनी देणार नोकरी; वाचा डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे वाढले जॉब्स या रिपोर्टनुसार, देशात डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर वाढल्यामुळे जॉब्सच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. तसंच 2030 पर्यंत बहुतांश जॉब्स आणि कर्मचाऱ्यांची जागा ऑटोमेशन आणि स्मार्ट मशिन्स घेणार आहेत. 2022 या वर्षांमध्ये तब्बल 133 मिलियन नवीन जॉब्स दिले जाणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या