JOIN US
मराठी बातम्या / करिअर / #MODIJIdeferNEETUG: "मोदी जी NEET UG परीक्षा पुढे ढकला"; विद्यार्थी का करताहेत थेट PM ना विनंती?

#MODIJIdeferNEETUG: "मोदी जी NEET UG परीक्षा पुढे ढकला"; विद्यार्थी का करताहेत थेट PM ना विनंती?

NEET 2022 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. वैद्यकीय इच्छुक का पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत ते सविस्तर जाणून घ्या.

जाहिरात

NEET प्रवेश परीक्षा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जून: नॅशनल एलिजिबिलिटी (National Eligibility) आणि एंट्रन्स परीक्षा 2022 (Entrance Exam 2022) शी संबंधित हॅशटॅग सोशल मीडियावर (Social Media Hashtags) ट्रेंड करत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA ने JEE Mains 2022 पुढे ढकलल्यापासून NEET परीक्षा (NEET Exam 2022) देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. ट्विटरवर #MODIJIdeferNEETUG ट्रेंड करत आहे. NEET परीक्षेसाठी (Why NEET Exam tags is trending on Twitter) विद्यार्थ्यांना फार कमी वेळ मिळणार आहे म्हणून NEET 2022 (NEET Exam 2022 date) पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सुरु आहे. NTA च्या अधिसूचनेनुसार, NEET UG 17 जुलै 2022 रोजी ऑफलाइन मोडमध्ये घेण्यात येईल. NEET पुढे ढकलण्यासाठी NTA किंवा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NEET 2022 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलल्याचे बोलले जात आहे. वैद्यकीय इच्छुक का पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत ते सविस्तर जाणून घ्या. Agneepath Mission: सरकारकडून मोठी घोषणा; तब्बल 50 हजार तरुणांना सैन्यात नोकरी

विद्यार्थ्यांनी असा युक्तिवाद केला की NEET-UG 2021 चे समुपदेशन मार्चमध्ये संपले आणि संपूर्ण अभ्यासक्रम सुधारण्यासाठी त्यांच्याकडे फक्त तीन महिन्यांची विंडो होती. जे इच्छूक पहिल्यांदा NEET ला बसणार आहेत त्यांनी सांगितले की त्यांना NEET UG 2022 वर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी एक अतिशय कमी वेळ मिळेल कारण केंद्रीय माध्यमिक मंडळाच्या (CBSE) वर्ग 12 ची बोर्ड परीक्षा उशिरा संपेल. NEET 2022 च्या तारखा किमान चार ते सहा आठवड्यांनी पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी इच्छुकांनी केली आहे.

संबंधित बातम्या

 NEET इच्छुकांसाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे इतर राष्ट्रीय-स्तरीय प्रवेश परीक्षांच्या तारखांचा संघर्ष. जे विद्यार्थी NEET 2022 सोबत कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) अंतर्गत अभ्यासक्रमांसाठी देखील अर्ज करणार आहेत त्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळणार नाही.

नोकरीची बंपर लॉटरी; कोणतीच परीक्षा नाही; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये थेट मिळणार जॉब यापूर्वी, 10,000 हून अधिक लोकांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला त्यांच्या मागण्यांसह पत्र लिहिले होते. दिल्ली विद्यापीठ, जामिया, JNU यासह विविध केंद्रीय विद्यापीठांद्वारे ऑफर केलेल्या UG अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी CUET जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात होणार आहे. तरीही पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे, केवळ समुपदेशन प्रक्रियेसाठी 6 महिने राखून ठेवण्याऐवजी , NTA आणि सरकारने परीक्षेच्या तयारीसाठी इच्छुकांना 40-60 दिवस अतिरिक्त देणे आवश्यक आहे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या