JOIN US
मराठी बातम्या / करिअर / MH 11th Admissions: अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलीत ना? मग दुसऱ्या टप्प्याची सुरु करा तयारी; इथे मिळतील Links

MH 11th Admissions: अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलीत ना? मग दुसऱ्या टप्प्याची सुरु करा तयारी; इथे मिळतील Links

आता निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. निकालाच्या आधी हजारो विद्यार्थ्यांनी प्रतेय्क शहरांमध्ये आपले रजिस्ट्रेशन्स केले आहेत.

जाहिरात

अकरावीच्या प्रवेशासाठी प्रचंड उत्साह

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जून: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यात अकरावी प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया (Class 11th Online Admission process) सुरू करण्यात आली आहे. यासाठी 30 मे 22 पासून ऑनलाईन अर्जप्रकिया (11th standard admission process in Maharashtra) सुरू करण्यात आली आहे. ही अर्ज प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे असं सांगण्यात आलं होतं. त्यापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी प्रचंड उत्साह बघायला मिळत आहे. Career After 10th: दहावीनंतर Polytechnic की 12वी? तुमच्यासाठी हा असेल शिक्षणाचा बेस्ट पर्याय अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणेजच भाग-I 30 मे पासून सुरू झाला आहे. या तारखेपासून 11 वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी (Class 11th Online Admission) सुरू करू शकत होते. तसेच दहावीचा निकाल (Class 10 Results) जाहीर झाल्यानंतर या अर्जाचा दुसरा टप्पा म्हणजेच भाग-II भरता येणार होता. त्यानुसार आता निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. निकालाच्या आधी हजारो विद्यार्थ्यांनी प्रतेय्क शहरांमध्ये आपले रजिस्ट्रेशन्स केले आहेत. MH BOARD SSC RESULT: आर्थिक परिस्थितीमुळे 10वीनंतर लगेच जॉब हवाय? मग या भरती परीक्षांची करा तयारी असा असेल प्रवेशाचा दुसरा टप्पा संबंधित अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये होणार आहे. या प्रक्रियेसाठी नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना जिथे त्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा महाविद्यालयांची प्राधान्य यादी द्यावी लागेल. या प्राधान्य फॉर्ममध्ये किमान एक आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांची नावे भरता येतील. विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे. तसंच ज्या शहरांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया घेतली जाणार आहे. त्या शहरांची वेगळी वेबसाईट देण्यात आली आहे. कोणत्या शहरासाठी कोणती वेबसाईट मुंबई - mumbai.11thadmission@gmail.com नागपूर - nagpur.11thadmission@gmail.com पुणे - 11thonlineadmissiondydpune@gmail.com नाशिक - nashik.11centralize@gmail.com अमरावती - amravati.11centralize@gmail.com

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या