JOIN US
मराठी बातम्या / करिअर / काय सांगता! काहीही न करता बोर होण्याचाही असा होतो फायदा; हा VIDEO जरूर पाहा

काय सांगता! काहीही न करता बोर होण्याचाही असा होतो फायदा; हा VIDEO जरूर पाहा

पॉडकास्ट होस्ट मनुष झोमोरोडी (Manoush Zomorodi) यांच्या मते, कंटाळा अनुभवल्यास, तसंच कधी कधीही काही न करणंही मेंदूच्या तल्लखतेसाठी आणि पर्यायाने यशासाठी आवश्यक आहे.

जाहिरात

बोर होत असतानाच तुमचा मेंदू असतो जास्त Active

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 09 नोव्हेंबर: आपल्या अवतीभोवती असणाऱ्या काही जणांची जीवनशैली आपल्याला फारच रटाळ आणि कंटाळवाणी वाटते. आपण एखाद्या व्यक्तीला बोलण्याच्या ओघात ‘किती बोअरिंग आहेस’ असंदेखील म्हणतो. आपल्यापैकी प्रत्येक जण कधी ना कधी बोअर होत असतो. थोडक्यात काय, तर एखादं काम करण्याचा कंटाळा येतो किंवा ते करण्याची आपली अजिबात इच्छा नसते. कधी-कधी असं होतं, की कपड्यांच्या घड्या करताना, भांडी धुताना किंवा विशेष असं काहीही काम करत नसताना आपल्याला सर्वांत क्रिएटिव्ह आयडिया मिळते. हे असं का होतं? याबाबत आपण गांभीर्यानं विचार करत नाही; पण या गोष्टीमागे एक वैज्ञानिक कारण आहे. टेड टॉक स्पीकर आणि पॉडकास्ट होस्ट मनुष झोमोरोडी (Manoush Zomorodi) यांच्या मते, कंटाळा अनुभवल्यास, तसंच कधी कधीही काही न करणंही मेंदूच्या तल्लखतेसाठी आणि पर्यायाने यशासाठी आवश्यक आहे. टेड कॉन्फरन्सेसच्या लिंक्डइन अकाउंटवर मनुष झामोरोडी यांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांनी याबद्दल चर्चा केली आहे. झोमोरोडी यांनी टेड टॉकमध्ये कंटाळा, सर्जनशीलता आणि नावीन्य यांच्यातला संबंध स्पष्ट केला आहे. जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये नेमकं काय होतं, हे शोधण्यासाठी त्यांनी काही न्यूरोसायंटिस्ट आणि कॉग्निटिव्ह सायकॉलॉजिस्टशी संपर्क साधला. त्यातून त्यांना अतिशय रंजक माहिती मिळाली. जेव्हा आपल्याला कंटाळा येतो तेव्हा मेंदूमध्ये ‘डिफॉल्ट मोड’ नावाचं नेटवर्क आपोआप सुरू होतं. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, आपलं शरीर कमी क्रिएटिव्ह किंवा कंटाळवाणी वाटणारी कामं करताना ऑटोपायलट मोडवर असतं. तेव्हा आपला मेंदू नवीन न्यूरल कनेक्शन तयार करण्यात व्यग्र होतो. त्यामुळे नवनवीन कल्पना डोक्यात येतात. Career Tips: नक्की काय असतात सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स? कोणत्या स्किल्स आहेत IMP? झोमोरोडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआरआयमध्ये मेंदूच्या अ‍ॅक्टिव्हिटीचं मोजमाप शक्य आहे. कंटाळा आल्यावर नेमकं काय होतं हे एमआरआयमध्ये दिसू शकतं. जेव्हा आपल्याला कंटाळा आलेला असतो तेव्हा, ‘ऑटोबायोग्राफिकल प्लॅनिंग’ या अ‍ॅक्टिव्हिटीच्या नावाखाली आपला मेंदू वेगवेगळ्या कल्पना जोडू लागतो आणि आपल्या समस्यांवर उत्तरं मिळतात. आपण आपल्या भूतकाळातल्या घटनांकडे पाहतो, मोठ्या क्षणांची नोंद घेतो, स्वत:च्या आयुष्याची एक कथा तयार करतो आणि नंतर आपण ध्येयं ठरवतो. ती गाठण्यासाठी आपण कोणती पावलं उचलली पाहिजेत याचा शोध घेतो; पण, सतत फोन स्क्रोल करत राहिलो किंवा मल्टीटास्किंग करत बसलो तर आपला मेंदू जास्त विचार करू शकत नाही, असं मनुष झोमोरोडी म्हणाल्या. आपल्या टेड टॉकमध्ये झोमोरोडी यांनी बोअरडम रिसर्चर सँडी मॅन आणि न्यूरोसायंटिस्ट डॅनियल लेव्हिटीन यांच्या अभ्यासाचे संदर्भही दिले. झोमोरोडी पुढे असा सल्ला देतात की, प्रत्येकानं स्वत:साठी काही वेळ काढावा. ऑनलाइन अ‍ॅक्टिव्हिटीसाठी वापरत असलेला वेळ कमी केला पाहिजे. असं केल्यास, आपण मानसिकरित्या किती व्यग्र आहोत, याबाबत स्पष्टता येते. परिणामी, आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी मदत होते. 12वी नंतर बेस्ट कॉलेज हवंय ना? मग ‘या’ 5 गोष्टी नक्की ठेवा लक्षात; सुसाट पुढे जाईल करिअर झोमोरोडी म्हणतात, “सखोल विचार करून कठोर परिश्रम करण्यापासून स्वतःचं लक्ष काही काळ विचलित करायचं असेल तर थोडा ब्रेक घ्या. खिडकीतून बाहेर पाहा आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा, की काहीही न केल्यानं आपण खरोखर जास्त क्रिएटिव्ह विचार करू शकतो का? सुरुवातीला तुम्हाला ही गोष्ट विचित्र वाटेल; मात्र कंटाळा खरोखर यश मिळवून देऊ शकतो.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या