बोर्डाकडून जारी करण्यात आलेले नियम
मुंबई, 14 मार्च: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा (Maharashtra State Board 12th exam) राज्यात उद्यापासून म्हणजेच 4 मार्चपासून सुरु होणार आहे. संपूर्ण दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण घेतल्यानंतर आता विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षांचा (Offline 12th Board Exam) सामना करावा लागणार आहे. त्यामुळे विउद्यार्थ्यांच्या मा आत एक प्रकारची चिंता निर्माण झाली आहे. काही विद्यार्थ्यांना टेन्शनही आलं आहे. मात्र यामुळे अनेकदा विद्यार्थी करू नये ती चूक (Mistakes to avoid during board exams) करून बसतात. परीक्षेच्या भीतीमुळे महत्वाच्या वस्तू घरी विसरतात. तर सेंटरला गेल्यानंतरही काही सूचनांचं पालन करत नाहीत. मात्र विद्यार्थ्यांनो घाबरू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips for board exams) आणि सूचना देणार आहोत ज्यांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. परीक्षेच्या काळात सेंटरला जाताना आणि गेल्यानंतर खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा. वेळेचं पालन करा परीक्षेच्या किमान २ तास आधी अभ्यास बाजूला ठेऊन २ मिनिटं शांतपणे डोळे मिटून बसा. स्वतःच्या मेंदूला आणि मनाला शांत करा. त्यानंतर आपली सर्व कामं करून वेळेत परीक्षेला जा. किमान १ तास आधी परीक्षेच्या सेंटरवर पोहोचा. यामुळे तुम्हाला तुमचा वर्ग आणि जागा शोधण्यास वेळ मिळू शकेल. यंदाची 10वीची परीक्षा असणार खास; विद्यार्थ्यांना पेपरदरम्यान मिळणार या सुविधा हॉल तिकीट तपासून घ्या परीक्षेला बसण्यासाठी हॉल तिकीट महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे परीक्षेला जाताना आपलं हॉल तिकीट सोबत घ्यायला विसरू नका. तसंच सोबत २-३ पेन . पेन्सिल, शार्पनर, खोडरबर, स्केल आणि इतर महत्वाच्या सर्व गोष्टी आठवणीनं घ्या. यासाठी वस्तूंची यादी बनवून घ्या आणि ती भिंतीवर लावून ठेवा. यामुळे तुम्हाला सगळं घेतलं की नाही हे लक्षात राहील. हॉल तिकीट सांभाळून ठेवा अशा वेळी घाबरू नका. लगेच तुमच्या सेंटरवरील अधिकारांना याबाबत माहिती द्या. तसंच त्यांना हॉल तिकिटशिवाय परीक्षा देऊ देण्याची परवानगी मागा. मात्र असं काहीच होऊ नये म्हणून तुमच्या हॉल तिकीटाची एक झेरॉक्स नेहमी आपल्या बॅगमध्ये ठेवा. जर तुमचं हॉल तिकीट हरवलं तर अधिकाऱ्यांना ही झेरोझ दाखवून मग परीक्षा देण्याची परवानगी मागा. हे सर्व करताना आपला आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. कॉपीपासून राहा सावधान परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थी कागदांचे तुकडे खिशात लपवून कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा हे विद्यार्थी उत्तर लिहून झाल्यावर कागद वर्गात फेकून देतात. असा कुठला कागद तुमच्या जागेजवळ असला तर त्याला हात लावण्याआधी वर्गातील शिक्षकांना सांगा. असं केल्यामुळे कुठलाही चुकीचा आरोप तुमच्यावर होणार नाही. तुम्ही शांतपणे आपला पेपर देऊ शकाल. विद्यार्थ्यांनो, परीक्षेदरम्यान खाण्या-पिण्याकडे द्या लक्ष; असा ठेवा आहार पाण्याची बाटली जवळ बाळगा उन्हळ्याच्या दिवसांत परीक्षा असल्यामुळे तुम्हाला तहान लागू शकते. त्याचप्रमाणे अनेकदा भरपूर लांबून सेंटरला पोहोचल्यानंतर तुम्हाला तहान लागू शकते. अशावेळी तुमच्याजवळ स्वतःची पाण्याची बाटली नसल्यास तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. तसंच परीक्षेत तुमचं लक्ष लागू शकत नाही. म्हणूनच परीक्षेला जाताना नेहमी आपल्याजवळ पाण्याची बाटली जरूर ठेवा