कमी-बजेट देशांची यादी
मुंबई, 10 ऑक्टोबर : महाराष्ट्रात मेडिकल शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या बातमीचा मेडिकल अंडर ग्रॅज्युएट प्रवेशापूर्वीच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बणार आहे. फी रेग्युलेटरी अॅथॉरिटीने ( शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी राज्यभरातील विविध प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसद्वारे ऑफर केल्या जाणार्या ग्रॅज्युएट कोर्सेसच्या फीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. एफआरएने जारी केलेल्या नोटिफिकेशन्सनुसार, 8 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीनंतर प्रायव्हेट कॉलेजेसमधील यूजी मेडिकल कोर्सेसच्या फी वाढीस मान्यता देण्यात आली आहे. प्रवेशापूर्वी मेडिकल कोर्सेसची फी वाढल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय. काय आहे बदल? काही लहान बदलांसह प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या फीचं स्ट्रक्चर मागील वर्षीच्या तुलनेत सारखंच आहे. मुंबईतील सायनमध्ये असलेल्या के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेजमधील पहिल्या वर्षाच्या मेडिकल शिक्षणाची फी वर्षाला 10 लाख रुपयांवरून 11.27 लाख रुपये करण्यात आलंय. त्याचबरोबर अहमदनगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव वाय. के. पाटील मेडिकल कॉलेजची फी वर्षासाठी 9.8 लाख रुपयांवरून 11 लाख रुपये झाली आहे. नागपुरातील एन.के.पी. साळवे इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरची वार्षिक फी देखील 10.6 लाख रुपयांवरून 11.6 लाख रुपये झाली आहे. ‘या’ कॉलेजेसच्या फीमध्ये बदल प्रकाश इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, सांगलीने त्यांच्या फीमध्ये कपात केली आहे. या कॉलेजने त्यांची फी 8.4 लाख रुपयांवरून 4.8 लाख रुपये प्रतिवर्ष केली आहे. पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि नाशिकमधील एमव्हीपीएस वसंतराव पवार मेडिकल कॉलेजने त्यांच्या फी स्ट्रक्चरमध्ये किरकोळ बदल केले आहेत. तर चिपळूणमधील बीकेएल वालावलकर मेडिकल कॉलेज आणि नवी मुंबईतील तेरणा मेडिकल कॉलेजने फी स्ट्रक्चरमध्ये कोणताही बदल केलेला नाही. फ्रेशर्ससाठी सर्वात मोठी खूशखबर! ‘ही’ नामांकित IT कंपनी तब्बल 5000 जागांवर करणार भरती “FRA ने त्यांच्या वेबसाइटवर 10 कॉलेजेसचं नवीन मंजूर फी स्ट्रक्चर अपलोड केलं आहे. अशा परिस्थितीत येत्या आठवडाभरात उर्वरित प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या फीबाबत स्पष्टता येईल, अशी आशा आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी फी स्ट्रक्चरबाबत स्पष्टता असणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून कॉलेजचे प्रेफरन्स त्यानुसार भरता येतील,” असं ब्रिजेश सुतारिया नावाच्या पालकाने सांगितलं. दरम्यान, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी सिक्युरिटी डिपॉझिट क्लॉज लागू करण्यात आले आहेत. अशा स्थितीत प्रवेशाच्या बाबतीतही याचं पालन होईल, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.