JOIN US
मराठी बातम्या / करिअर / गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून 'हा' व्यक्ती पाळतोय गाढवं; करतोय लाखोंची कमाई

गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून 'हा' व्यक्ती पाळतोय गाढवं; करतोय लाखोंची कमाई

गाढव हा ओझं वाहून नेण्यापुरता उपयोग असलेला प्राणी, एवढंच काय ते गाढवाबद्दल सर्वांना माहिती असतं. एरव्ही गाढवांच्या आयुष्यात हेटाळणी ठरलेलीच; पण गाढवांची खरी किंमत कर्नाटकातल्या एका व्यक्तीने ओळखली, म्हणून तर ती व्यक्ती मल्टिनॅशनल कंपनीतली (Multi National Company) गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून गाढव पाळत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

  मुंबई, 14 जून-   गाढव हा ओझं वाहून नेण्यापुरता उपयोग असलेला प्राणी, एवढंच काय ते गाढवाबद्दल सर्वांना माहिती असतं. एरव्ही गाढवांच्या आयुष्यात हेटाळणी ठरलेलीच; पण गाढवांची खरी किंमत कर्नाटकातल्या एका व्यक्तीने ओळखली, म्हणून तर ती व्यक्ती मल्टिनॅशनल कंपनीतली (Multi National Company) गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून गाढव पाळत आहे. विशेष म्हणजे या गाढवांच्या माध्यमातून ती व्यक्ती लाखो रुपयांची कमाईही करत आहे. कर्नाटकातल्या या व्यक्तीने नेमकं काय केलं आहे, हे जाणून घेऊ या. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. कर्नाटकातले 42 वर्षांचे श्रीनिवास गौडा (Shrinivas Gowda) यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला सुरुवात केली; पण नोकरीपेक्षा व्यवसायाकडे अधिक कल असल्याने काही काळानंतर त्यांनी 2020 मध्ये इरा हे मूळ गाव गाठलं. गावातच जवळपास 2.3 एकरचा प्लॉट घेऊन त्यांनी तिथे गाढवं पाळण्याचा व्यवसाय सुरू केला. श्रीनिवास यांनी या व्यवसायात पडू नये म्हणून कुटुंबीयांनीही त्यांना नकार दर्शवला; पण कुटुंबाचा रोष पत्करून त्यांनी 20 गाढवांपासून व्यवसायाला सुरुवात केली. मित्र व नातेवाइकांना या व्यवसायाबद्दल कळल्यानंतर त्यांनीही श्रीनिवास यांची खूप थट्टा केली आणि हिणवलं; पण सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपलं काम सुरू ठेवलं.

आपल्या अनोख्या व्यवसायाबद्दल बोलताना श्रीनिवास सांगतात, की गाढविणीच्या दुधात अनेक महत्त्वपूर्ण घटक असतात. औषध उद्योग व सौंदर्यप्रसाधन निर्मितीमध्ये या दुधाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो. याचाच व्यवसाय करत असल्याचं ते सांगतात. गाढविणीच्या 30 मिलिलिटर दुधाची किंमत सुमारे 150 रुपयांपर्यंत असते. आतापर्यंत त्यांना 17 लाख रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. पुढच्या काळात मॉल्स, दुकानं आणि सुपर मार्केटमध्येही गाढविणीच्या दुधाचा पुरवठा करणार असल्याचं श्रीनिवास सांगतात. दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात त्यांनी गाढवांसाठी फार्म उभं केलं आहे. संपूर्ण कर्नाटकात पहिल्यांदाच अशा प्रकारचा फार्म सुरू केल्याचा दावाही त्यांनी केला. **(हे वाचा:** Law मधील करिअर सोडून आता प्राण्यांचे Feelings ओळखते ही महिला; वर्षाची कमाई वाचून चक्रावून जाल ) उच्च शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळावी हा उद्देश समोर ठेवून अनेक तरुण झटत असतात. त्यातल्या त्यात अभ्यासात मागे राहणाऱ्या मुलाला नेहमी गाढवाची उपमा देऊन हिणवलं जातं; पण याच गाढवांचा आधार घेऊन व्यवसाय यशस्वी करून लाखो रुपयांची उलाढाल करता येऊ शकते, हे श्रीनिवास गौडा यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्या यशस्वी व्यवसायाचे दाखलेही आता सगळीकडे दिले जात आहेत. आता त्यांना नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या