अवघ्या 10 मिनिटांमध्ये बनवा CV
मुंबई, 11 जुलै: Powerful Resume म्हणजेच शक्तिशाली रिझ्युम म्हणजे नेमकं काय? आपल्याला जो उमेदवार हवा आहे तो हाच, अशी रिक्रूटरची खात्री पटवून देणाऱ्या सर्व घटकांचा समावेश असलेल्या रिझ्युमला पॉवरफुल रिझ्युम (How to make Powerful Resume) असं म्हणतात. तुमचा रिझ्युम निर्णायक ठरण्यासाठी आणि पटकन त्यातलं वेगळेपण दिसून येण्यासाठी कशाचा समावेश त्यात करायचा, हे पाहूया. असा बनवा Powerful Resume प्रोजेक्ट्स आणि त्यांचा प्रभाव यांचा स्पष्ट उल्लेख करा. फक्त त्याचं महत्त्व खूपच फुलवून सांगू नका. त्याचं खरं स्वरूपच मांडा. तुमच्याकडे कोणती स्किल्स आहेत, याची नोंद करा. तुम्ही तांत्रिकदृष्ट्या कसे प्रगत आहात, याची नेमकी उदाहरणं द्या. समस्या सोडवण्यास उपयुक्त असलेली तुमची स्किल्स अधोरेखित होतील, याची काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फसवणूक करू नका, खोटं काही लिहू नका. तुमची निवड झाल्यानंतर फुगा फुटू शकतो. अहो, भीती वगैरे सोडा; ‘या’ सुपर टिप्स फॉलो करा आणि बिनधास्त द्या Job Interview तुम्हाला याची जाणीव पाहिजे, की रिझ्युम म्हणजे तुमचा अॅक्सेस. रिक्रूटरकडे (Recruiter) तुमचा रिझ्युम पुढच्या पातळीवर नेण्याची क्षमता असते. त्यामुळे योग्य आणि प्रभाव पाडणारा रिझ्युम तयार करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करा. तुमच्या क्षमता प्रकर्षाने दिसतील अशा पद्धतीने त्यात मांडा. त्यासाठी योग्य ती माहिती आणि उदाहरणं सोबत द्या. रिझ्युम पॉवरफुल असेल, तर इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये जाण्याची शक्यता वाढते. आम्ही रिक्रूटर कम्युनिटीचा एक सर्व्हे केला होता. त्यात असं आढळलं, की जेव्हा एखादा रिझ्युम उत्तम पद्धतीने लिहिलेला असतो, तेव्हा रिक्रूटर त्या उमेदवाराशी बोलण्याची शक्यता दोन ते तीन पटींनी वाढते. कारण, मुद्देसूद, योग्य पद्धतीने बांधणी केलेला रिझ्युम असेल, त्यात सर्व महत्त्वाचे मुद्दे असतील, तर त्यातून उमेदवाराचं व्यक्तिमत्त्व, कामाप्रति निष्ठा आणि भविष्यातल्या करिअरसाठी असलेली सज्जता या गोष्टी दिसून येतात. 2019मध्ये बेंगळुरूतल्या एका बैठकीत मला काही हायरिंग मॅनेजर्स (Hiring Managers) भेटले. रिझ्युमवरून पुढच्या पातळीसाठी निवड करण्याचं काम ते करायचे. साधा एक कागद किंवा पीडीएफ डॉक्युमेंट कंपनीचं नशीब कसं ठरवू शकतं, याबद्दल मला आश्चर्य वाटलं. होय, कंपनीचं नशीब. कारण निवडलेल्या उमेदवारामुळे फरक पडू शकतो. उमेदवाराला आपला रोल किती कळला आहे, हे रिझ्युममध्ये सर्वांत महत्त्वाचं असतं, असं त्यांनी मला सांगितलं. रिझ्युम तपासायला अवघी काही मिनिटं असतात, तेवढ्या काळात हे कळतं कसं, असा प्रश्न मी विचारला. या प्रश्नाचं उत्तर गुंतागुंतीचं असेल, असं मला अपेक्षित होतं; मात्र उत्तर खूप सोपं होतं. रिझ्युमचं स्ट्रक्चर (Resume Structure) आणि ऑर्गनायझेशन या दोनच गोष्टींवरून ते कळतं, असं उत्तर मला मिळालं. 1. इंटरव्ह्यूअर्स (Interviewers) विचारांच्या स्पष्टतेचा आदर करतात. पुढच्या पातळीसाठी निवड होणाऱ्यांपैकी 43 टक्के उमेदवारांचे रिझ्युम्स असे असतात. 2. डिटेल्ड रिझ्युममुळे कॉन्फिडन्स बिंबवला जातो. त्यामुळे उमेदवार इंटरव्ह्यूअरची पकड घेतो. त्यामुळे 71 टक्के हायर रिझल्ट्स लागतात. सर्वांत चांगली नोकरी आणि भरघोस सॅलरी फक्त तुमचीच; जॉब सर्चमध्ये हे ठेवा लक्षात
3. Complimentary Structure : तुम्ही मॅनेजरियल पोझिशनसाठी अर्ज करत असलात, तर मॅनेजमेंट किंवा लीडरशिपचा तुमचा पूर्वानुभव आवर्जून रिझ्युममध्ये उद्धृत करावा. उदाहरणार्थ, तुम्ही कॉलेज क्लब मॅनेजर किंवा फुटबॉल टीमचे कॅप्टन अशा जबाबदाऱ्या निभावलेल्या असल्यास ते लिहावं. का, असा प्रश्न मनात आलाच असेल. त्यावरून कळतं, की तुम्हाला असा अनुभव आहे. हे न लिहिणाऱ्या व्यक्ती अपात्र ठरतात, असा त्याचा अर्थ नव्हे; पण अशी अधिक माहिती दिल्यास निवडीची शक्यता नक्की वाढते.