JOIN US
मराठी बातम्या / करिअर / NEET UG परीक्षेत कमी मार्क्स आलेत तरी मिळेल गव्हर्नमेंट कॉलेज; फक्त 'या' टिप्स करा फॉलो

NEET UG परीक्षेत कमी मार्क्स आलेत तरी मिळेल गव्हर्नमेंट कॉलेज; फक्त 'या' टिप्स करा फॉलो

कमी मार्क्स असूनही सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार कसा? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

जाहिरात

'या' तारखेपासून सुरु होणार दुसरा राउंड

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 सप्टेंबर: काही दिवसांपूर्वी NEET UG परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी काउन्सिलिंग लवकरच सुरु होणार आहे. यंदा NEET चा कट-ऑफ गेल्या काही वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे काउन्सिलिंग नक्की कसं होणार कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागले आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळाले आहेत त्यांनाही सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश हवाय. पण कमी मार्क्स असूनही सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार कसा? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. NEET UG 2022 काउंसिलिंन्ग प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य कोटा समुपदेशनानंतर अखिल भारतीयकाउन्सिलिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांचे NEET स्कोअर अपेक्षेपेक्षा कमी आहे त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. कमी NEET स्कोअर (वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश) असूनही सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवण्याचे काही मार्ग जाणून घ्या. विसरलात की काय? लगेच जा मुलाखतीला; आज कोणतीही परीक्षा न देता इथे मिळतेय थेट नोकरी सरकारी महाविद्यालयात NEET कट ऑफ काय आहे? सामान्य श्रेणीतील AIQ अंतर्गत सरकारी जागेवर प्रवेश मिळविण्यासाठी, NEET स्कोअर 620 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, राज्य कोट्यातील जागांवर, 590 पर्यंत गुण असलेल्यांना सरकारी जागा मिळू शकतील. ओबीसी श्रेणीसाठी पात्रता गुण कमी आहेत परंतु सरकारी जागेसाठी कट ऑफ जवळजवळ सामान्य आहे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 450 पेक्षा जास्त गुण मिळाल्यास सरकारी महाविद्यालयात जागा मिळू शकते. कमी मार्कांसह कसा मिळेल प्रवेश कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला सरकारी महाविद्यालयातूनच शिक्षण घ्यायचे असेल तर तो अभ्यासक्रम बदलू शकतो. एमबीबीएसच्या जागा भरल्या आणि सरकारी कॉलेज न मिळाल्यास बीडीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. यासाठी, AIQ समुपदेशनामध्ये, सामान्य श्रेणीतील 590 पेक्षा जास्त, OBC साठी 575, SC/ST साठी 525 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. ग्रॅज्युएट आहात ना? मग कोणतीच परीक्षा न देताही मिळेल नोकरी; ‘या’ कॉलेजमध्ये बंपर भरती NEET 2022 राज्य कोटा काउन्सिलिंग म्हणजे काय? NEET 2022 साठी 85 टक्के राज्य कोट्यातील जागांसाठी काउन्सिलिंग संबंधित राज्य प्राधिकरण त्यांच्या वेबसाइटवर करतील. सर्वसाधारणपणे, NEET 2022 राज्यकाउन्सिलिंगसाठी एकूण तीन फेऱ्या घेतल्या जातात. राज्य कोट्यासाठी NEET 2022 काउन्सिलिंग त सहभागी होणाऱ्या उमेदवारांना अधिवास पात्रता निकष पूर्ण करावे लागतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या