JOIN US
मराठी बातम्या / करिअर / क्या बात है! आता B.Com आणि M.Com साठी कॉलेजमध्ये जाण्याची गरजच नाही; असं घरबसल्या घेता येईल शिक्षण

क्या बात है! आता B.Com आणि M.Com साठी कॉलेजमध्ये जाण्याची गरजच नाही; असं घरबसल्या घेता येईल शिक्षण

तुम्हालाही कॉमर्समध्ये शिक्षण घ्यायचं असेल आणि ऑनलाईन शिक्षण घ्यायचं असेल तर हे कोर्सेस तुमच्या साठी बेस्ट ठरू शकतात. चला तर जाणून घेऊया घरबसल्या कसं करता येईल B.Com आणि M.Com

जाहिरात

असं घरबसल्या घेता येईल शिक्षण

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑगस्ट: आजकाल शिक्षणापासून तर ऑनलाईन पेमेंट्सपर्यंत सर्वकाही डिजिटल आणि रिमोट पद्धतीनं होत चाललं आहे. कोरोणकाळात विद्यार्थ्यांनी संपूर्ण दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण घेतलं आहे. त्यात डिजिटल कोर्सेसच्या वेबसाईट्समुळे प्रोफेशनल्सनाही ऑनलाईन कोर्सेस करता येत आहेत. अनेक विद्यार्थी असेही असतात ज्यांना बारावीनंतर लगेच जॉब करावा लागल्यामुळे किंवा घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही. म्हणूनच आता अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन B.Com आणि M.Com पूर्ण करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. जर तुम्हालाही कॉमर्समध्ये शिक्षण घ्यायचं असेल आणि ऑनलाईन शिक्षण घ्यायचं असेल तर हे कोर्सेस तुमच्या साठी बेस्ट ठरू शकतात. चला तर जाणून घेऊया घरबसल्या कसं करता येईल B.Com आणि M.Com (How to do Online B.Com and M.Com). ऑनलाइन B.Com कोर्स बीकॉम हा तीन वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे. जो 6 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक सेमिस्टरच्या शेवटी परीक्षा असतात. हा अभ्यासक्रम करण्यासाठी कोणत्याही उमेदवारानं बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. जर एखादा विद्यार्थी हा अभ्यासक्रम 3 वर्षांत उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर तो 6 वर्षांतही पूर्ण करू शकतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवार सहजपणे नोकरीसाठी अर्ज करू शकतात. ना कोणती परीक्षा, ना कुठली ऑनलाईन टेस्ट; राज्यातील ‘या’ कॉलेजमध्ये मिळेल थेट नोकरी; हा घ्या मुलाखतीचा पत्ता पात्रता निकष ऑनलाइन बीकॉम कोर्स करण्यासाठी, उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याशिवाय राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पाच टक्के सूट मिळू शकते. ऑनलाइन बीकॉम कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बारावीत कॉमर्समध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. या कोर्सची एकूण कोर्स फी: 80,000/- रुपयांपर्यंत असू शकते. ऑनलाइन M.Com कोर्स ऑनलाइन बीकॉम कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी एम.कॉम कोर्स करावा लागेल. हा अभ्यासक्रम करण्यासाठी पदवीधर असणं आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. ते केल्यानंतर, तुम्ही नोकरीसाठी सहज अर्ज करू शकता. डेटा सायन्स ते सायबर सेक्युरिटी देशातील टॉप IIT मध्ये तरुणांसाठी बेस्ट कोर्सेस

पात्रता निकष

ऑनलाईन M.Com कोर्स करण्यासाठी उमेदवारांना आधी B.Com कोर्स करावा लागेल. पदव्युत्तर अभ्यासक्रम केल्याशिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करणं अशक्य आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पदवीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. याशिवाय राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 5 टक्के सूट मिळते. जर एखाद्याला हा मास्टर्स कोर्स 2 वर्षात करता येत नसेल तर तो 4 वर्षात देखील पूर्ण करू शकतो. या पदव्युत्तर कोर्सची फी सुमारे 1 लाख रुपये इतकी असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या