JOIN US
मराठी बातम्या / करिअर / नोकरी बदलण्यात पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत महिला, कारणही आहे महत्त्वाचं

नोकरी बदलण्यात पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत महिला, कारणही आहे महत्त्वाचं

नोकरीच्या (Jobs) बाबतीतही महिला पुरुषांना मागे टाकत आहेत. नोकरी बदलण्याच्या बाबतीत पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला आता पुढे असल्याचा दावा एका सर्वेक्षणातून करण्यात आला आहे

जाहिरात

Representative Image

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जानेवारी: आज विविध क्षेत्रात महिला आणि पुरुष बरोबरीने काम करत आहेत. अनेक क्षेत्रात तर महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. आता नोकरीच्या (Jobs) बाबतीतही महिला पुरुषांना मागे टाकत आहेत. नोकरी बदलण्याच्या बाबतीत पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला आता पुढे असल्याचा दावा एका सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. ‘वर्क लाइफ’मध्ये (Work Life) संतुलन राहावं यासाठी महिला सातत्यानं नव्या नोकरीच्या शोधात असतात. कोरोनामुळे (Corona) सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांनी आपली नोकरी गमावली आहे. त्यामुळे पुरेसा पगार नसल्याचं कारण देऊन दुसरी नोकरी शोधण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील असल्याचं दिसून येतं. ‘लिंक्डइन’च्या (LinkedIn) सर्वेक्षण अहवालानुसार, कोरोना काळात वर्क फ्रॉम होममुळे (Work From Home) महिला कर्मचाऱ्यांचा वर्क लाइफ बॅलन्स विस्कळित झाला आहे. अशा परिस्थितीत सध्याची नोकरी सोडून महिला अतिशय झपाट्यानं नवीन संधींचा शोध घेत आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 43 टक्के महिलांनी असं सांगितलं की, आपण सध्या तातडीने नवी नोकरी शोधत आहोत. वर्क लाइफ बॅलन्स उत्तम ठेवण्यासाठी आपण नोकरी बदलू इच्छित असल्याचं 37 टक्के महिलांनी सांगितलंं. हे वाचा- Income Tax Return: करदात्यांना आता ऑनलाइनच भरावा लागेल ITR- CBDT जॉब मार्केटमध्ये वर्षभर हालचाली सुरू राहणार जॉब मार्केटमध्ये वर्षभर हालचाली सुरू राहतील. 82 टक्के कर्मचारी नोकरी बदलू इच्छितात. यात फ्रेशर्सची (Freshers) संख्या सर्वाधिक म्हणजेच 92 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. जनरेशन झेडमधले म्हणजेच 1990च्या दशकाच्या मध्यानंतर जन्मलेले 87 टक्के प्रोफेशनल्स नोकरी बदलण्यासाठी इच्छुक आहेत. नोकरी बदलण्याची काही प्रमुख कारणं - नव्या वर्षात नोकरी बदलण्यामागं प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत. - सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 30 टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितलं, की त्यांना वर्क लाइफमध्ये बॅलन्स साधणं अशक्य होत आहे. - कामासोबत कुटुंबालाही वेळ देता येईल, अशा नोकरीचा शोध हे कर्मचारी घेत आहेत. - पुरेसा पगार (Salary) मिळत नसल्याने 28 टक्के कर्मचारी नव्या संधी शोधत आहेत. - 23 टक्के कर्मचारी प्रमोशनसाठी नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत. हे वाचा- Gold Price Today:सोने-चांदी खरेदीची चांगली संधी,इथे तपासा आजचा महाराष्ट्रातील दर प्रोफेशनल्समध्ये नोकरी गमावण्याची भीती वाढली लिंक्डइन न्यूज इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अंकित वेंगुर्लेकर यांनी सांगितलं, की ‘45 टक्के प्रोफेशनल्स त्यांच्या जॉब प्रोफाइलवर समाधानी आहेत. 45 टक्के प्रोफेशनल्स (Professionals) करिअरबाबत असमाधानी आहेत. या वर्षी चांगली संधी मिळत असल्याचं 38 टक्के व्यक्तींचं म्हणणं आहे; मात्र आता नोकरी जाण्याची भीती वाढली आहे. 71 टक्के प्रोफेशनल्स आता कोरोना काळापूर्वी आपली क्षमता काय होती, कोणत्या क्षमतेच्या जोरावर आपल्याला हे काम मिळालं आणि भविष्यातही ते कायम राहणार का असे प्रश्न जास्त प्रमाणात विचारत आहेत.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या