Youth Ideathon 2022 ची घोषणा
मुंबई, 25 ऑगस्ट: टेक्नॉलॉजीमुळे आजकाल अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वच जण स्मार्ट झाले आहेत. त्यामुळे गाद लहान वयापासूनच मुलांमध्ये उद्योजक होण्याचं स्वप्नं निर्माण झालं आहे. अगदी लागण वयापासूनच मुलं नवनवीन आयडिया घेऊन प्रयोग करू लागले आहेत. याच गोष्टीला पुढे वा देण्यासाठी CBSE आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) ने इंडिया @75 (आझादी का अमृत महोत्सव): Youth Ideathon 2022 ची घोषणा केली आहे. या बहु-स्तरीय महोत्सवाने शालेय विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण उद्योजकीय कल्पना आमंत्रित केल्या आहेत. यामध्ये मुलांना बक्षीसही देण्यात येणार आहेत. 9वी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतच शिक्षण फ्री..फ्री..फ्री; ‘स्वयं’ पोर्टल लाँच
परदेशातील CBSE संलग्न शाळांसह संपूर्ण भारतातील इयत्ता 4 ते 12 वीचे विद्यार्थी आयडियाथॉनमध्ये विनामूल्य सहभागी होऊ शकतात. Youthideathon.in/submit-your-idea या वेबसाईटवर जाऊन त्यांना त्यांच्या कल्पना सादर कराव्या लागणार आहेत. ही टीम बेस्ड स्पर्धा आहे. पात्र विद्यार्थी फक्त तीन ते पाच सदस्यांच्या टीम्समध्ये भाग घेऊ शकतात.ज्यामध्ये प्रत्येक टीममध्ये तीन सदस्य असणं आवश्यक आहे तर पाचच्या वर सदस्य नकोत.
काय मिळतील बक्षीस
पहिल्या 25 टीम्सना प्रत्येकी 10,000 रुपयांच्या बक्षीस रकमेसह प्रोटोटाइपिंग पुरस्कार मिळतील. या शीर्ष 25 टीम्सपैकी, निवडलेल्या अव्वल 10 टीम्सना प्रत्येकी 100,000 रुपये इनक्युबेशन डोनेशन दिलं जाईल. शिटवर्क, महिला उद्योजकांसाठी एक-स्टॉप नॉलेज हबने सर्वोत्कृष्ट महिला विद्यार्थिनी नवोदितासाठी 25,000 रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. 10वी पास असाल तर सरकारी नोकरीची संधी सोडू नका; DRDOमध्ये 1901 जागांसाठी भरती
मॅनेजमेंट एंटरप्रेन्योरशिप प्रोफेशनल स्किल्स कौन्सिल (MEPSC), MSDE अंतर्गत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि ThinkStartup (TS) यांच्या सहकार्याने गेल्या वर्षी हा कार्यक्रम सुरू केला होता. हा उद्योजकीय विचारांचा चार टप्प्यांचा महोत्सव असेल आणि त्यात विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि शाळांसाठी आकर्षक बक्षिसं आणि ओळखीच्या संधी असतील, असं अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हंटलं आहे.