JOIN US
मराठी बातम्या / करिअर / HSC-SSC Board Exam : कशी सोडवावी प्रश्न पत्रिका? बोर्डाची उत्तरपत्रिका लिहिताना...

HSC-SSC Board Exam : कशी सोडवावी प्रश्न पत्रिका? बोर्डाची उत्तरपत्रिका लिहिताना...

उत्तर पत्रिका लिहिताना काय काळजी घ्यावी, वाचा सविस्तर

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 फेब्रुवारी: बारावी आणि दहावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अभ्यास तर झाला आहे मात्र आता उत्तर पत्रिका सोडवताना खरा कसं लागणार आहे. ही उत्तर पत्रिका लिहिताना काय काळजी घ्यावी. कशा पद्धतीनं लेखन करावं याबाबत जाणून घेणार आहोत. 1. परीक्षा गृहात पोहोचल्यावर सर्वप्रथम ती नीट खाडाखोड न करता भरून घ्या. त्यामध्ये कोणतीही गोष्ट सुटणार नाही चूक होणार नाही याची काळजी घ्या. 2. कोणत्याही प्रकारच्या खाणाखुणा, इतर माहिती, नोट कोणत्याही प्रकारचं लेखन करू नये. कारण ते अवैध समजलं जातं. 3. उत्तर पत्रिकेवर लिहायला सुरुवात करण्याआधी अर्धा इंच दोन्ही बाजूनं जागा सोडावी. त्यामुळे आपलं लिहिलेलं उत्तर घडीच्या आत किंवा उत्तर पत्रिका फाटल्यास जाणार नाही. ते सेफ राहिलं. 4. नवा प्रश्न नव्या पानावर सुरू करावा. त्यासोबत आकृत्या आणि चार्ट नीट काढावा आणि त्याला चौकोन करावा. हेही वाचा- Board Exam 2020 : भाषा विषयांचा अभ्यास करताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा 5. उत्तर पत्रिका लिहिताना किमान वाचनीय अक्षरात आणि स्वच्छ दिसेल अशी लिहावी. खाडाखोड झाली असेल तर  एक रेष मारून पुढे जावे. एकाच वेळी चार रेषा मारल्यामुळे उत्तर पत्रिका वाईट दिसते. 6. पेपर सोडवताना आधी सोपे प्रश्न किंवा आधी कमी लिहिण्यासारखे मार्क मिळवून देणारे प्रश्न शांतचित्तानं सोडवावेत. त्यांना वेळ कमी लागतो. मोठे अथवा अधिक मार्कांसाठी असणारे प्रश्न किती शब्द लिहायचे हे आधी ठरवून घ्यावं. 7. बऱ्याचवेळा आपल्याकडे मुद्दे खूप असतात अशावेळी क्रमांक टाकून मुद्दा आणि त्यामध्ये दोन ते तीन ओळीमध्ये उत्तर मांडण्याचा प्रयत्न करावा. 8. थेअरम असल्यास त्याची आकृती काढून तो व्यवस्थित मांडणं अपेक्षित आहे. गणित सोडवताना शक्यतो एका पानावर एक गणित अशा हिशोबानं सोडवावं. 9. आपला पेपर साधारण 30 ते 35 पानांचा असतो. याशिवाय सप्लिमेंटची सुविधा असते. त्यामुळे पेपर सुटसुटीत आणि स्वच्छ वाटेल असा सोडवा. त्याचा परिणाम आपल्या गुणांवर होत असतो. अक्षर बारी किंवा फार मोठं असेल तर मोकळं आणि योग्य जागा सोडून लिहावं. ज्यामुळे पेपर दिसायला सुटसुटीत दिसेल. 10. आपल्याला एखादा रफ वर्क करायचं असेल तर मागच्या पानावर करावं. तिथे रफ वर्क असा उल्लेख करावा. हेही वाचा- HSC-SSC Board Exam : परीक्षेला जाता जाता…या गोष्टी करायला अजिबात विसरू नका

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या