JOIN US
मराठी बातम्या / करिअर / विद्यार्थ्यांनो, बोर्डाच्या निकालाचं अजिबात टेन्शन घेऊ नका; अशा पद्धतीनं स्वतःला ठेवा Stress Free

विद्यार्थ्यांनो, बोर्डाच्या निकालाचं अजिबात टेन्शन घेऊ नका; अशा पद्धतीनं स्वतःला ठेवा Stress Free

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (How to be cool) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही टेन्शन न घेता रिलॅक्स (How to get Tension free) राहू शकाल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 एप्रिल: एप्रिल महिना सुरु आहे त्यामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा (Board Exams) सुरु आहेत. तर काही राज्यांमध्ये बोर्डाच्या परीक्षा होऊन गेल्या आहेत. आता मात्र विद्यार्थी निकालाची (Board exam Results 2022) प्रतीक्षा करत आहेत. महाराष्ट्रात शिक्षण ऑनलाईन झालं मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थी नाराजही होते. ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थी आता टेंशनमध्ये (Tension of exam result) आहेत, निकाल कसा लागणार? आपल्याला किती मार्क्स मिळणार? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडू लागले आहेत. मात्र अशा परिस्थितीत शांत (How to deal with stress) राहण्याची गरज आहे. तुम्हालाही जर अशाच प्रकारचं टेन्शन (How to avoid Result Tension) आलं असेल तर चिंता नको. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (How to be cool) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही टेन्शन न घेता रिलॅक्स (How to get Tension free) राहू शकाल. चला तर मग जाणून घेऊया. आजकाल सर्व परीक्षार्थी आपापल्या विषयांच्या उजळणीत व्यस्त आहेत. ज्यांच्या परीक्षा झाल्या आहेत ते निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा स्थितीत त्यांचे तणावात राहणे स्वाभाविक आहे. पण करिअर एक्सपर्ट आणि हेल्थ अॅडव्हायझरच्या मते, कधी कधी हा ताण खूप जीवघेणा ठरतो. IAS Tips: उमेदवारांनो, अशा पद्धतीनं करा UPSC चा अभ्यास; पहिल्याच प्रयत्नात व्हाल IAS तुम्ही परीक्षेत काय लिहिले आहे आणि तुम्हाला किती मार्क्स मिळणे अपेक्षित आहे हे तुम्हाला चांगले माहीत असले पाहिजे. या स्थितीत निकाल जाहीर होईपर्यंत ताणतणाव घेण्यात काही अर्थ नाही. जर तुम्ही बोर्डाचा निकाल किंवा प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची वाट पाहत असाल, तर तुमचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. निकालापूर्वी स्वत:ला रिलॅक्स कसे ठेवायचे? काही वेळा निकाल जाहीर होण्याची प्रतीक्षा फार मोठी होते. अशा परिस्थितीत, उमेदवार त्यांचा संयम गमावू लागतात आणि चिडचिड होऊ लागतात या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेऊ शकता-निकाल जाहीर होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी मार्क्सचा विचार करू लागतात. असे केल्याने, त्यांना चिंताग्रस्त समस्या असू शकतात. म्हणूनच निकालाचा विचार करण्याऐवजी, आपल्या आवडत्या गोष्टींचा विचार करा आणि स्वतःला शांत ठेवा. निकाल जाहीर होण्यापूर्वी आणि नातेवाईक किंवा मित्रांचे फोन लगेचच घेऊ नका. अशा फोनकडे दुर्लक्ष करा. ते फोनवर निकालावर चर्चा करतील, ज्यामुळे तुमच्यावर ताण येऊ शकतो. विद्यार्थ्यांनो, उन्हाळ्याच्या सुटीत पुस्तकांना बनवा तुमचे मित्र; ‘ही’ IMP पुस्तकं एकदा वाचाच विचार सकारात्मक ठेवल्याने तुमचा संयम वाढेल आणि तुम्हाला बरे वाटेल. या काळात पालकांनी मुलांचे सर्वोत्तम सल्लागार बनून त्यांना खंबीर व्हायला शिकवले पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या