आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याचबरोबर अनेक महानगरपालिकांच्याही निवडणुका होणार असल्याने या बदल्या महत्वाच्या मानल्या जात आहेत.
मुंबई, 04 ऑक्टोबर: राज्यात नुकतीच पोलीस भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यात बोर्डाचे बारावीचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अनेक तरुण तरुणी पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करणार आहेत. मात्र नुसतं आपल्या करून फायदा नाही. पोलीस होण्यासाठी प्रचंड मेहनत आणि अभ्यास करण्याची गरज असते. जर तुम्हालाही पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे बारावीनंतर तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यास करण्यात नक्कीच मदत होईल. चला तर जाणून घेऊया. पोलिसात नोकरी मिळविण्यासाठी पात्रता निकष पोलीस विभागात बारावीनंतर फक्त कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करता येतो. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार प्रथम भारताचे नागरिक असले पाहिजेत आणि त्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असावेत. वेगवेगळ्या पदांसाठी कमाल वय असले तरी अर्जदारांचे किमान वय 18 वर्षे असावे. उंची किमान 168 सेमी असावी. राखीव उमेदवारांसाठी काही शिथिलता आहे. घरच्यांना वाटायचं ट्रॅव्हल एजंट आहे मुलगा; पठ्ठ्यानं उभी केली 400 कोटींची कंपनी
बारावीनंतर या पदांवरही मिळते नोकरी
पोलीस खात्यात बारावीनंतरच हवालदाराची नोकरी मिळेल, असे बहुतांश उमेदवारांना वाटते. पण आम्ही तुम्हाला सांगतो की बारावी उत्तीर्ण उमेदवारांना पोलिस खात्यात आणखी अनेक पदे मिळू शकतात. 12वी नंतर तुम्हाला कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, PSI आणि SI इत्यादी पदे देखील मिळू शकतात. पीएसआय आणि एसआय पदांसाठी ग्रॅज्युएशन आवश्यक असले तरी काही भरतींमध्ये 12वी पासची शैक्षणिक पात्रता मागितली जाते. Life@25 : अनेकदा अपयश आलं, शेवटी अभ्यासाची रणनीती बदलली; पुढल्याच प्रयत्नात IAS स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी उमेदवाराला स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. लोकसेवा आयोग प्रत्येक राज्यात पोलीस हवालदारांच्या भरतीसाठी पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा घेतो. PSC प्रत्येक राज्यातील कायद्याच्या अंमलबजावणीतील रिक्त पदांनुसार परीक्षा आयोजित करते. परीक्षेची अधिसूचना मुख्य रोजगार दैनिकांमध्ये प्रकाशित केली जाते. यानंतर जे लोक लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत उत्तीर्ण करतात ते पोलीस हवालदार बनू शकतात; एकदा, त्यांनी या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या की, त्यांना कठोर प्रशिक्षण कार्यक्रमातून जावे लागेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच ते पोलिस सेवेत रुजू होऊ शकतात.