सरकारी नोकरीसाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. दिवसरात्र खूप अभ्यास करतात. अनेक खासगी कंपन्या कर्मचार्यांना कामावरून कमी करतात. यासाठीच सरकारी नोकरीला विशेष महत्त्च आहे. सरकारी नोकरी म्हणजे आयुष्यभराची हमी असते. कारण सरकारी नोकरीत निवृत्तीनंतरही कर्मचार्यांना पेन्शन मिळत राहते. तरुणांनी सरकारी नोकरीकडे वळावे यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असतं. भारतीय रेल्वे हा भारत सरकारचा उपक्रम आहे. भारतीय रेल्वे आपल्या विविध योजनाअंतर्गत रोजगार निर्मिती करते. त्याच्या अंतर्गत असलेल्या ईस्टर्न रेल्वेने अॅप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहेत. ज्या इच्छुक उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी इंडियन रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर अर्थात er.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करावा. या पदांच्या भरतीची प्रक्रिया 30 सप्टेंबर 22 पासून सुरू झाली आहे. तसंच उमेदवार या https://er.indianrailways.gov.in वरही या पदासाठी अर्ज करू शकतात. तसंच Indian Railway Recruitment 2022 Notification PDF या अधिकृत नोटिफिकेशनवरही माहिती मिळेल. भारतीय रेल्वेतर्फे एकंदर 3115 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू होतेय. भरती प्रक्रियेसाठी महत्त्वाच्या तारखा:- उमेदवारांनी अर्ज करण्याच्या प्रक्रियेस 30 सप्टेंबर 2022 पासून सुरूवात होईल. तसंच अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर 22 असेल. एकूण रिक्त पदांची वर्गवारी खालीलप्रमाणे:- एकूण रिक्त पदे:- 3115 हावडा डिव्हिजन:- 659 लिलुआ वर्कशॉप:- 612 सियालदह डिव्हिजन:- 440 कांचरापाडा वर्कशॉप:- 187 मालदा डिव्हिजन:- 138 आसनसोल वर्कशॉप:- 412 जमालपूर वर्कशॉप:- 667 पात्रतेचे निकष:- इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत किमान 50% गुण मिळवणं आवश्यक आहे. तसंच एनसीव्हीटी/एससीव्हीटीद्वारे दिलेल्या पत्रकानुसार संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट मिळवलेलं असायला हवं. वयोमर्यादा:- अर्ज करणार्या उमेदवाराचं वय हे 15 ते 24च्या दरम्यान असायला हवं. अर्ज करताना उमेदवारांनी ही महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी. निवड प्रक्रिया:- पात्र उमेदवारांची योग्यता आणि आयटीआयचे सरासरी गुण पाहिले जातील. त्यातून निवड झालेल्या उमेदवारांनाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येईल. भारतीय रेल्वे ही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी असलेली सरकारी संस्था आहे. रेल्वे आपल्या विविध उपक्रमांतर्गत रोजगारनिर्मिती करत आहे. यामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोकांना रोजगार उपलब्ध होतो. अनेक गरजू, कमी शिकलेले लोक याचा नेहमीच लाभ घेतात. यासाठीच इच्छुक उमेदवारांनी रेल्वेच्या वेबसाईटवर जाऊन भरती प्रक्रियेची माहिती घ्यावी.