स्पर्धा परीक्षांमध्ये GK ची तयारी
मुंबई, 18 मे: कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी (Preparation for Competitive Exams) करताना काही गोष्टींची तयारी करणं खूप महत्त्वाचं असतं. यात रिझनिंग, एप्टीट्यूड आणि गणित या विषयांची तयारी करावी लागते. यामध्ये GK म्हणजे सामान्य ज्ञान (How to Prepare GK in Exams) हा महत्त्वाचा विषय असतो. सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये जनरल नॉलेज (General Knowledge for exams) हा विषय असतोच म्हणून याची तयारी करणंही आवश्यक आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये GK ची तयारी कशी करावी याबाबत माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया. दररोज वर्तमानपत्र वाचा वर्तमानपत्र वाचून माणसाला अनेक फायदे होतात. बोलण्याची शैली, लिहिण्याची पद्धत आणि वाचनाची पद्धत देखील वर्तमानपत्र वाचण्यातून येते. त्यामुळे तुमच्या ज्ञानातही भर पडते आणि तुम्हाला योग्य पद्धतीने बोलणे, लिहिणे व वाचणेही येते. पालकांनो, मुलांना कमी वयातच मिळेल करिअरची दिशा; लहानपणापासूनच Coding शिकवणं आवश्यक GK पुस्तक वाचा तुमचे ज्ञान वाढवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे वाचन. पुस्तके हे ज्ञानाचे सर्वोत्तम स्त्रोत आहेत. तुम्ही विविध विषयांवरील नॉन-फिक्शन पुस्तके मोठ्या संख्येने वाचली पाहिजेत. क्लासिक पुस्तके देखील वाचा कारण साहित्यावरील प्रश्न खूप सामान्य आहेत आपण पुस्तके वाचून जास्तीत जास्त सामान्य ज्ञान आणि जागरूकता सहज वाढवू शकता. पुस्तके वाचून तुम्ही जास्तीत जास्त सामान्य ज्ञान आणि जागरूकता सहज वाढवू शकता. Career Tips: ग्रॅज्युएशननंतर PG करण्याची इच्छा आहे? मग ‘या’ विषयांत करा पोस्ट ग्रॅज्युएशन; करिअर होईल उत्तम क्विझ आणि जीके गेम्समध्ये सहभागी व्हा तुम्ही दर महिन्याला किमान एक GK चाचणी द्यावी. अनेक क्विझ आणि जीके गेम फॉरमॅटमध्ये देखील उपलब्ध आहेत, त्यांच्यात सामील होणे खूप मनोरंजक आहे. खेळांमध्ये सहभाग घेतल्याने बुद्धिमत्ता विकसित होते. यामुळे तुमचे ज्ञानही वाढते आणि रुचीही वाढते. या सर्व खेळांसोबत तुमची सतत मेहनत सुरू राहते, ज्यामुळे तुमचे लक्ष केंद्रित राहते.