JOIN US
मराठी बातम्या / करिअर / नवीन नोकरीत मनासारखा पगार हवाय? मग आईला लावा फोन, सोशल मीडियावर व्हायरल होतेय आयडिया

नवीन नोकरीत मनासारखा पगार हवाय? मग आईला लावा फोन, सोशल मीडियावर व्हायरल होतेय आयडिया

‘भैय्या-ठीकठाक लगा दो, वो दुसरी कंपनीवाले ज्यादा दे रहे हैं, ’ असं सांगायलाही आपल्या आया कमी करणार नाहीत, असंही एका युजरनं म्हटलं आहे. एकूणात, नितेश यादवच्या या ट्विटची सध्या जोरदार हवा आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 9 जुलै : आपला पगार वाढणार असेल किंवा अन्य फॅसिलिटीज वाढणार असतील, तर आपण नवीन नोकरी स्वीकारतो. नोकरी बदलताना नवीन नोकरीच्या ठिकाणी सीव्ही (CV), इंटरव्ह्यू (Interview) वगैरे सर्व औपचारिक गोष्टी झाल्या, की मग पगारासाठीची घासाघीस (Bargaining For Salary) सुरू होते. हीच तर मुख्य गोष्ट असते. कारण HR बरोबर या वाटाघाटी यशस्वी झाल्या आणि आपल्या मनासारखा पगार देण्याचं नवीन कंपनीनं मान्य केलं, तर मग आपल्यालाही नवीन नोकरीत उत्साह येतो; पण या HR वाल्यांशी डील कसं करायचं? सध्या ट्विटरवर याबद्दलचं मजेदार ट्वीट व्हायरल होत आहे. याबद्दलचं सविस्तर वृत्त ‘टीव्ही 9 हिंदी’ने दिलं आहे. HR मधल्या व्यक्ती या वाटाघाटीमध्ये अगदी मुरलेले असतात. त्यामुळे ते ताकास तूर लागू न देता त्यांचंच म्हणणं आपल्या गळी उतरवतात. आपली पगाराबद्दलची सगळी स्वप्नं या पाच-दहा मिनिटांच्या चर्चेत अगदी उद्ध्वस्त होतात. अशा वेळेस आपल्या बाजूने बोलणारं या HR पेक्षा वरचढ असं कुणी तरी हवं असं प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटत असतं. अर्थातच हे ‘कुणी तरी’ म्हणजे आपली आई. आईसारखी बार्गेनिंग पॉवर (Bargaining Power Like Mummy) जगात कुणाचीही नसते. याबद्दलच्या मजेदार पोस्ट, ट्विट्स सध्या भरपूर व्हायरल होत आहेत. आपल्या मुलांसाठी तर आई काहीही करायला तयार असते; मग HR शी बोलणं हे तर तिच्यासाठी अगदी सोपं काम आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअर नितेश यादव याचं हे ट्विट भलतंच व्हायरल झालं आहे. HR बरोबर पगाराची चर्चा करताना आपल्याबरोबर आपल्या आईलाही कॉलवर ठेवलं पाहिजे असा नितेशनं दिलेला सल्ला ट्विटकऱ्यांना प्रचंड आवडला (Nitesh Yadav Tweet Goes Viral). आपली आई HR कडून अर्थातच आपल्याला बेस्ट डील मिळवून देईल, जे कदाचित आपल्याला कधीही शक्य होणार नाही,असं ट्विट नितेशनं केलं होतं. केवळ डिग्रीसाठीच नाही तर देशाला पुढे नेण्यासाठी शिक्षण आवश्यक: PM मोदी ‘मी माझ्या आईला फोन लावू शकतो का? कारण ती जास्त चांगली घासाघीस करेल,’अशा अर्थाचं ट्विट @imniteshy या अकाउंटवरून करण्यात आलं होतं. हे ट्विट अनेकांना आवडलं. ते अनेकांनी रिट्विट तर केलंच; पण त्यावर मजेदार कमेंट्स पाहायला मिळत आहेत. ‘असं झालं तर आया असं म्हणतील - कमीत कमी 150 टक्के पगारवाढ द्यायला लागेल, नाही तर आम्ही दुसरीकडे जाऊ. तू एकटाच नोकरी देणारा नाहीस,’ अशा अर्थाची गमतीदार प्रतिक्रियाही यावर देण्यात आली आहे. भाजी घेताना आपल्या आया जशा भाजीवाल्यांशी घासाघीस करतात, तसंच त्या करतील असंही काहींनी म्हटलं आहे. “ही ट्रिक खरोखरच उपयोगी आहे, वापरून पाहू या,” असं आणखी एका युझरने म्हटलं आहे. ‘ही तर पैसे डबल करण्याची निंजा टेक्निक आहे,’असंही एकाने म्हटलं आहे. ‘भैय्या-ठीकठाक लगा दो, वो दुसरी कंपनीवाले ज्यादा दे रहे हैं, ’ असं सांगायलाही आपल्या आया कमी करणार नाहीत, असंही एका युजरनं म्हटलं आहे. एकूणात, नितेश यादवच्या या ट्विटची सध्या जोरदार हवा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या