माजी सरन्यायाधीशांचं मोठं पाऊल
मुंबई, 13 ऑगस्ट: गरजू विद्यार्थ्यांसाठी अनेक मोठे व्यक्ती आपल्या कमाईतून किंवा पगारातून मदत करत असतात. तसंच पाऊल आता सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार रंजन गोगोई (Ex CJI and Rajya Sabha Leader Ranjan Gogoi) यांनी उचललं आहे. कायद्याचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खासदार म्हणून कमावलेला त्यांचा संपूर्ण पगार दान करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील कोणत्याही राज्यातून पाच वर्षांची कायद्याची पदवी घेणार्या कोणत्याही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती म्हणून त्यांच्याकडून पैसे दिले जातील असं वृत्त ANI वृत्तसंस्थेने दिलं आहे. मार्च 2020 मध्ये राज्यसभेवर नामनिर्देशित झालेल्या गोगोई यांनी त्यांच्या पगारातून आणि राज्यसभेने त्यांना दिलेला भत्ता यापैकी एक पैसाही घेतला नाही. तर, गोगोईंनी आजवर घेतलेल्या पैशातून आणि भत्त्याने शिष्यवृत्ती निधीची निर्मिती केली आहे. “या पैशाचा विद्यार्थ्यांना, विशेषत: कायद्याचा अभ्यास करणाऱ्यांसाठी चांगला उपयोग झाला पाहिजे. मला खात्री आहे की गेल्या दोन वर्षांपासून मला मिळणारा भत्ता आणि पगार किमान 10 ते 15 विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुरेसा असेल." असं राज्यसभेचे विद्यमान खासदार रंजन गोगोई यांनी ANI ला सांगितलं आहे. क्या बात है! Google कंपनी UG विद्यार्थ्यांना देतेय इंटर्नशिपची मोठी संधी; या लिंकवर लगेच करा अप्लाय
ही शिष्यवृत्ती केवळ शिक्षण शुल्कच नाही तर विद्यार्थ्यांसाठी राहण्याचे शुल्क देखील कव्हर करेल, पुढील महिन्यापासून वैध असेल. आता वृत्तपत्रात जाहिरात देऊन शिष्यवृत्तीची जाहिरात करायची आहे जेणेकरून विद्यार्थी त्यासाठी अर्ज करू शकतील अशी माहिती मिळाली आहे.
असा करू शकाल अर्ज ज्या विद्यार्थ्यांना स्वारस्य आहे ते त्यांचे अर्ज या महिन्याच्या अखेरीस संबंधित अधिकाऱ्यांनी प्रदान केलेल्या ईमेल आयडीवर ईमेल करू शकतात. विद्यार्थ्यांना त्यांची नावे, संपर्क क्रमांक, ईमेल पत्ता, भौतिक पत्ता यासह तपशील देणे आवश्यक आहे. त्यांनी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या संस्थेचे नाव, बोर्डाच्या परीक्षेत त्यांना मिळालेल्या अभ्यासक्रमाच्या गुणांचा तपशील, गुणपत्रिकेची प्रत जोडणं आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षांच्या कौटुंबिक उत्पन्नाच्या पुराव्यासह 200 शब्दांपेक्षा कमी शब्दांचा अर्ज करणं आवश्यक असणार आहे. स्वतःच घडवा स्वतःचं भविष्य; ‘हे’ पार्ट टाइम जॉब्स ठरतील आयुष्याचा टर्निंग पॉईंट कोण आहेत रंजन गोगोई रंजन गोगोई (जन्म 18 नोव्हेंबर 1954) हे एक भारतीय माजी वकील आणि माजी न्यायाधीश आहेत ज्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सात वर्षे, प्रथमतः 2012 ते 2018 पर्यंत न्यायाधीश म्हणून आणि 2018 पासून 2019 पर्यंत 13 महिन्यांसाठी भारताचे 46 वे सरन्यायाधीश म्हणून काम केले.