JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Exam Tips: सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये थेट ऑफिसर पदावर नोकरी हवीये ना? मग 'ही' परीक्षा क्रॅक कराच

Exam Tips: सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये थेट ऑफिसर पदावर नोकरी हवीये ना? मग 'ही' परीक्षा क्रॅक कराच

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही GATE परीक्षा सहज क्रॅक करू शकाल. चला तर मग जाणून घेउया.

जाहिरात

'ही' परीक्षा क्रॅक कराच

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 31 ऑक्टोबर: ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग म्हणजेच GATE परीक्षा ही इंजिनिअरसाठी नवीन नाही. कोणताही इंजिनिअरिंग करणारा विद्यार्थी आयुष्यात एकदातरी GATE ही परीक्षा देतोच. मात्र इतर सर्व परीक्षांसारखीच GATE ही परीक्षा वाटते तितकी सोपी अजिबात नाही. आजकालच्या काळात तर UPSC MPSC प्रमाणेच GATE परीक्षेलाही महत्त्वं प्राप्त झालं आहे. म्हणूनच सर्वच विद्यार्थी GATE Crack करू शकतील असं नाही. मात्र आता चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही GATE परीक्षा सहज क्रॅक करू शकाल. चला तर मग जाणून घेउया. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असल्याने GATE 2023 मध्ये खूप स्पर्धा आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूरने अभियांत्रिकी पदवीधर अभियोग्यता चाचणी2022 साठी परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या परीक्षेद्वारे अनेक उमेदवारांना एम.टेक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. त्याच वेळी, काही उमेदवार PSUs मध्ये भरतीसाठी GATE परीक्षेत देखील बसतात. म्हणूनच ही परीक्षा खूप कठीण मानली जाते. जाणून घेउया हे परीक्षा क्रॅक कारण्यासाठी काही टिप्स. JEE Mains 2023: लवकरच जारी होणार अप्लिकेशन फॉर्म्स; पुढील वर्षी ‘या’ महिन्यांत होणार परीक्षा लगेच तयार करा टाइम टेबल गेट परीक्षेला फारसा वेळ उरलेला नाही. त्यामुळे तुमच्या उजळणीसाठी नवीन वेळापत्रक बनवा. असे विषय प्रथम ठेवा, जे सोपे आणि महत्त्वाचे आहेत. तुम्ही गणित आणि कोणत्याही मूलभूत तांत्रिक विषयाने (GATE 2023 Syllabus) याची सुरुवात करू शकता. विषय वाचत असताना, उजळणीसाठी नोट्स बनवत राहा. यामध्ये मुख्य व्याख्या, सूत्र इत्यादी लिहा. सर्व विषय वाचल्यानंतर, तुमच्या तयारीनुसार मागील वर्षांचे GATE पेपर सोडवा. हे खूप मदत करेल. Revision नोट्स येतील कामी GATE अभ्यासक्रम वाचताना रिव्हिजन नोट्स बनवा. गेल्या काही दिवसात, फक्त या नोट्स वाचून तुमची तयारी सुधारा. आठवड्यातून एकदा या रिव्हिजन नोट्स वाचा. यामुळे प्रत्येक विषयाच्या संकल्पना मनात ताज्या राहतील आणि परीक्षा देण्यात अडचण येणार नाही. महिन्याचा तब्बल 75,000 रुपये पगार आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब; संधी सोडू नका; शेवटची तारीख आज प्रत्येक विषय महत्त्वाचा GATE परिक्षेमध्ये अनेक विषय असतात. त्यामुळे परीक्षेची तयारी करताना केवळ एकाच विषयावर अधिक लक्ष केंद्रित करण्याऐवजी सर्व विषयांना समान वेळ द्या. यातून तुम्हाला कोणताही विषय सुटणार नाही. तुमच्या टाइम टेबलला चिकटून राहा आणि त्यानुसार GATE 2023 ची तयारी करा. Career Tips: नक्की किती असते एका एअर होस्टेसची सॅलरी? असे असतात पात्रतेचे कठोर निकष Mock टेस्ट देत राहा GATE परीक्षेचे स्वरूप समजून घेण्यासाठी, उमेदवारांनी शक्य तितक्या मॉक चाचण्या (GATE Mock Test) आणि मागील वर्षाचे पेपर आणि सराव पेपर्सचा प्रयत्न केला पाहिजे. सर्व विषय वाचल्यानंतर मागील वर्षांचे GATE पेपर सोडवा. प्रत्येक विषय आणि विषयानुसार क्विझ आणि मॉक टेस्ट द्या. यामुळे तुमच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यात आणि कमकुवत विषय सुधारण्यास मदत होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या