अशी करा डाउनलोड
मुंबई, 13 नोव्हेंबर: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत इयत्ता 10वी आणि 12वीची डेटशीट जारी करू शकते. पुढील वर्षी म्हणजेच 2023 च्या बोर्डाच्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर आवश्यक माहिती जारी केली जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच परीक्षांच्या तारखा जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागण्याची वेळ आहे. यावर्षी सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वी परीक्षेसाठी आणि 16 लाख विद्यार्थ्यांनी 12वी साठी नोंदणी केली आहे. CBSE बोर्ड परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा एकाच वेळी सुरू होणार असल्याचे मानले जात आहे. Maharashtra Police Bharti: 90 मिनिटांत ठरणार तरुणांचं भविष्य; 18,000 पदांसाठी असं असेल परीक्षेचं पॅटर्न 2023 मध्ये 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. CBSE बोर्ड परीक्षा 2023 साठी, दोन्ही वर्गांची तारीखपत्रक अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट देऊन डाउनलोड केले जाऊ शकते. त्याच वेळी, सीबीएसईने 10वी आणि 12वीचा विषयनिहाय नमुना पेपरही प्रसिद्ध केला आहे. नमुना पेपरसोबतच सर्व विषयांची मार्किंग योजनाही जाहीर करण्यात आली आहे. CBSE 10वी आणि 12वीच्या नमुना पेपरमध्ये काही प्रश्न ठेवण्यात आले आहेत, जे 2023 मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेत विचारले जाऊ शकतात. 2023 मध्ये CBSE बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी 2023 च्या बोर्ड परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप, विषय आणि प्रकार देखील इयत्ता 10वी आणि 12वीच्या नमुना पेपरच्या मदतीने जाणून घेऊ शकतात. CBSE बोर्डाची परीक्षा कधी होणार? विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा मार्चअखेर संपणार आहे, तर बारावीची परीक्षा एप्रिलच्या मध्यापर्यंत चालणार आहे. CBSE बोर्ड प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 1 जानेवारी 2023 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. IT Job Alert: मोठी ई-कॉमर्स कंपनी Flipkart मध्ये बंपर ओपनिंग्स; ‘या’ पोस्टसाठी Vacancy CBSE बोर्ड परीक्षा 2023 ची डेटशीट कशी डाउनलोड करावी? CBSE बोर्ड परीक्षा 2023 चे डेटशीट प्रसिद्ध झाल्यानंतर, एखाद्याला cbse.gov.in वर जावे लागेल. तेथे तुम्हाला ‘शैक्षणिक वेबसाइट’ वर क्लिक करावे लागेल. त्यावर दिसणार्या ‘CBSE 10, 12 Datesheet 2023 Download’ या लिंकवर क्लिक करा. डेटशीटचे पीडीएफ पेज नवीन विंडोवर उघडेल. ते तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी डाउनलोड करा.