CAT परीक्षेचं रजिस्ट्रेशन
मुंबई, 26 जुलै: व्यवसाय किंवा मॅनेजमेंटमध्ये (Education in management) आवड असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशननंतर MBA करण्याची प्रचंड इच्छा असते. पदवीनंतर MBA करून अनेक विद्यार्थी चांगला जॉब मिळवतात. मात्र चांगला जॉब मिळवण्यासाठी चांगल्या MBA कॉलजेमधून (Best MBA College in Maharashtra) शिक्षण घेणं महत्त्वाचं असतं. अनेकदा चांग कॉलेज न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगला जॉब लागू शकत नाही. पण मग चांगलं कॉलेज मिळणार कसं?. MBA चांगल्या कॉलजेमधून करायचं असेल तर CAT ही प्रवेश परीक्षा (What is CAT Exam?) देणं महत्त्वाचं असतं. CAT परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे. CAT परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘CAT Exam 2022 (CAT Exam 2022 date) 27 नोव्हेंबरला होणार आहे, यासंबंधीची जाहिरात 31 जुलैला जारी केली जाईल. अधिकृत वेबसाइट 1 ऑगस्ट रोजी लाइव्ह असेल, वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया, परीक्षेची तारीख, प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख यांचा तपशील असेल. कॅटच्या निमंत्रकांच्या म्हणण्यानुसार अर्जाची प्रक्रिया 03 ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे. Agniveer Recruitment: इंडियन नेव्हीमध्ये अग्निविरांसाठी भरती सुरु; पगारपाणी आणि पात्रतेविषयी इथे मिळेल संपूर्ण माहिती उमेदवार CAT 2022 साठी अधिकृत वेबसाइट- iimcat.ac.in वर अर्ज करू शकतात. CAT अर्जामध्ये करावयाच्या गोष्टींमध्ये नोंदणी, अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि नोंदणी शुल्क भरणे समाविष्ट आहे. CAT 2022 नोंदणी शुल्क SC, ST आणि PWD उमेदवारांसाठी रुपये 1,100 आणि इतर उमेदवारांसाठी 2,200 रुपये आहे. असा असेल परीक्षेचं पॅटर्न मौखिक क्षमता आणि वाचन आकलन; डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रिझनिंग; आणि परिमाणात्मक क्षमता. देशभरातील सुमारे १५८ परीक्षा केंद्रांवर प्रवेश परीक्षा घेतली जाईल. काय असेल पात्रता CAT 2022 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 50% सह पदवी पूर्ण केलेली असावी. SC/ST/PWD विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 45 टक्केवारीसह उत्तीर्ण झालेले असावेत. सर्वात मोठी संधी! MPSC तर्फे अधिकारी पदांच्या 433 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; ही घ्या अर्जाची डायरेक्ट लिंक या कॉलेजेसमध्ये मिळतो प्रवेश देशभरातील आयआयएममध्ये प्रवेशासाठी कॅट घेतली जाते. हे उत्तीर्ण झाल्यानंतर अहमदाबाद, अमृतसर, बंगळुरू, बोधगया, कलकत्ता, इंदूर, जम्मू, काशीपूर, कोझिकोड, लखनौ, नागपूर, रायपूर, रांची, रोहतक, संबलपूर, शिलाँग, सिरमौर, तिरुचिरापल्ली, उदयपूर येथील आयआयएममध्ये पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी प्रवेश मिळवू शकतात.