भोपाळ, 7 मे : प्रामाणिकपणे कष्ट केले तर काहीही अशक्य नाही, ही गोष्ट मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमधील (Indore) एका भाजी विक्रेत्याच्या (Vegetable Vendor) मुलीनं (Daughter) सिद्ध करून दाखवली आहे. अंकिता नागर (Ankita Nagar) असं नाव असेलल्या या मुलीनं सिव्हिल जज रिक्रुटमेंट एक्झाममध्ये (Civil Judge Recruitment Exam) यश मिळवलं आहे. अंकितानं या परीक्षेत एससी कॅटेगरीतून देश पातळीवर पाचवा क्रमांक मिळवला आहे. न्यूज एजन्सी ‘एएनआय’नं दिलेल्या वृत्तानुसार तिचे वडील अशोक नागर (Ashok Nagar) हे इंदूरमधील मुसाखेडी (Musakhedi ) भागात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. अभ्यास पूर्ण झाल्यावर अंकिता रोज तिच्या वडिलांना भाजीच्या दुकानात मदत करायची. लॉकडाउनच्या (Lockdown) काळात आपल्याला अभ्यासासाठी (Study) पुरेसा वेळ मिळाला होता, असं तिचं म्हणणं आहे. अभ्यासासाठी तिने यूट्युबची (YouTube) मदत घेतली होती. ‘लॉकडाउनदरम्यान अभ्यासासाठी मला खूप वेळ मिळाला. मी यूट्युबवर ऑनलाईन अभ्यास केला. मला सरकारकडून शिष्यवृत्ती (Scholarship) मिळाली असली तरी काही प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला, असं अंकितानं ‘एएनआय’ला सांगितलं. अंकितानं आपलं बहुतेक शिक्षण सरकारी स्कॉलरशीपच्या मदतीनं पूर्ण केलं आहे. तिच्या पालकांनीच तिला अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं होतं. तिला डॉक्टर (Doctor) होण्याची इच्छा होती. मात्र, मेडिकल अॅडमिशनची फी (Admission Fees) भरणं शक्य नसल्यामुळे तिनं सिव्हिल जज एक्झामची तयारी सुरू केली होती. ’ जी मुलं सर्व सोयीसुविधा मिळत असूनही अभ्यास करत नाहीत त्यांनी त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. लॉकडाऊन काळात आणि नंतर फॉर्म भरताना मला आर्थिक संकटाचा (Financial Crisis) सामना करावा लागला. पण, मी त्यातून मार्ग काढला. बरेच जणांनी मला लग्न करण्याचा सल्ला दिला होता. माझ्या पालकांनी मात्र, मला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं, असंही ती म्हणाली. ( ‘कुणीही शहाणपणा करू नये’, राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कडक शब्दांत आदेश ) अंकिताच्या पालकांनी सांगितलं की, आम्ही आमच्या मुलीला शिक्षणाची संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्या सहा वर्षांत आम्ही खूप तडजोडही (Compromise) केली. तिनेदेखील कोणत्याही विशेष सोयीसुविधा नसताना कसून अभ्यास केला आणि परीक्षा उत्तीर्ण केली. आम्हाला तिचा अभिमान वाटतो. कोणत्याही पालकांनी त्यांच्या मुलींना लग्नासाठी जबरदस्ती करू नये. त्याऐवजी अगोदर त्यांना शिक्षण दिलं पाहिजे.’ अंकिताचे वडील अशोक नागर म्हणाले की, ‘आमच्या कुटुंबानं खूप संघर्ष केला आणि मुलीच्या शिक्षणासाठी थोड्याफार पैशांची बचत केली. त्याच पैशातून अंकिताला शिक्षणासाठी मदत झाली. आता आनंद व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत.’ ‘लोक मुलगा आणि मुलगी असा भेदभाव (Differentiate) करतात. असं करू नये. मुलापेक्षा मुलगी चांगली असते. आता सगळे माझं अभिनंदन करायला येत आहेत. मला एकूण तीन मुलं आहेत. एका मुलानं एमबीए (MBA) केलं आहे. सर्वांत लहान मुलीचं लग्न झालं आहे. मधली मुलगी असलेली अंकिता आता जज (Judge) झाली आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे, मुलींनीही शिक्षण (Education) घेतलं पाहिजे, असंही तिचे वडील म्हणाले. ‘फक्त भाजीविक्रीच्या व्यवसायावर आमच्या कुटुंबाचा उदर निर्वाह चालतो. आम्ही पैशांची बचत करून मुलीच्या शिक्षणाला देत होतो. गेली पाच ते सहा वर्षे आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण गेली. मी माझ्या मुला-मुलींना सारखीच वागणूक दिली आहे. त्यांना शिक्षणाची समान संधी दिली आहे,’ अशी प्रतिक्रिया अंकिताची आई लक्ष्मी नागर यांनी दिली आहे. गरीब कुटुंबातील अंकितानं अभ्यास करून यश मिळवलं आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.