मुंबई, 27 डिसेंबर: भारतात कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे भीतीचं वातावरणं निर्माण होऊ लागलं आहे. या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाची चौथी लाट आल्यास हॉस्पिटॅलिटी, वाहतूक, पर्यटन आणि रिअल इस्टेट यासारख्या क्षेत्रांतील कंपन्या पुन्हा आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहेत, असं एका अहवालात म्हटलं आहे. लाइव्ह मिंटनं, स्टँटन चेस या रिक्रुटमेंट फर्मच्या सिंगापूर आणि भारतातील व्यवस्थापकीय भागीदार माला चावला यांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, ‘नोकरभरतीमध्ये मंदीची लाट सुरू असतानाच कोविड वाढीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील ग्राहक अधिक सावध होत आहेत. पण, उत्पादन आणि ग्राहक यांसारख्या इतर क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचारी भरती करणं थांबवलेलं नाही.’ ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी मोठी बातमी; पुण्यात जॉब हवाय ना? ही इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी करतेय भरती; करा अप्लाय त्या असंही म्हणाल्या की, अलीकडच्या काळात पाश्चिमात्य देशांमधील मंदीमुळे नोकरभरतीवर परिणाम होत आहे. त्यामुळे नोकऱ्यांची संख्या गेल्या वर्षीसारखी नसेल. क्लायंट्स सतर्क आणि सावध आहेत. भारताबाबत त्यांना चांगली माहिती आहे. लाइव्ह मिंटच्या वृत्तामध्ये, टॅलेंट सोल्युशन्स प्रोव्हायडर करियरनेटचे सीईओ आणि सह-संस्थापक अंशुमन दास यांचा हवाला देऊन म्हटलं आहे की, हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाईल, कमर्शियल आणि ऑफिस रिअल इस्टेट, ट्रॅव्हल, ट्रान्सपोर्टेशन आणि मोबिलिटी हाय अलर्टवर असेल. MSRTC Recruitment: लाल परी सुसाट वेगानं येत देणार जॉब्स; 10वी पाससाठी बंपर ओपनिंग्स चीन आणि जगातील इतर अनेक देशांमध्ये कोविड रुग्णसंख्येमध्ये प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (25 डिसेंबर) नागरिकांना सतर्क राहण्यास आणि विषाणूजन्य आजाराबाबत खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. बिहारमधील गया विमानतळावर चार परदेशी नागरिकांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौघांनाही बोधगया येथील हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नवीन आकडेवारीनुसार भारतात 196 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये किरकोळ वाढ होऊन ती तीन हजार 428 वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत देशात 4.46 कोटी (4,46,77,302) नागरिकांना कोविडची लागण झालेली आहे. सर्वात मोठी खूशखबर! ही मोठी IT कंपनी मुंबईत विनापरीक्षा देणार जॉब्स; थेट होणार ऑफ कॅम्पस ड्राइव्ह सकाळी आठ वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार, केरळमधील दोन मृत्यूंसह देशातील मृतांची संख्या पाच लाख 30 हजार 695 इतकी झाली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 0.56 टक्के तर विकली पॉझिटिव्हिटी रेट 0.16 टक्के नोंदवला गेला आहे, अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे. स्टार्टअप हायरिंगमध्ये अग्रेसर असलेली टेक कंपनी एक्सफेनोचे सह-संस्थापक कमल कारंथ म्हणाले, “कोविड-19 चा प्रभाव, रिमोट वर्किंगसारख्या कामाच्या स्वरूपावर परिणाम करू शकतो. नोकरभरतीच्या संख्येपेक्षा प्रवासाच्या योजनांवर याचा जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे.”