JOIN US
मराठी बातम्या / करिअर / CBSE 10th Board Result: आईचा मृत्यू, बापाचं दुसरं लग्न, घरातून बेदखल.. आजीकडे राहत श्रीजा बिहार टॉपर

CBSE 10th Board Result: आईचा मृत्यू, बापाचं दुसरं लग्न, घरातून बेदखल.. आजीकडे राहत श्रीजा बिहार टॉपर

Bihar News: पाटणाच्या राजवंशीनगरच्या डीएव्ही स्कूलची विद्यार्थिनी श्रीजा हिने सीबीएसई दहावीच्या बोर्डाच्या निकालात 99.4 टक्के गुण मिळवून बिहारमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तिला संस्कृत आणि विज्ञान विषयात 100 गुण मिळाले आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पाटणा, 24 जुलै : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल (CBSE 10th Board Exam Result) नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. मात्र, एका मुलीनं देशभरातील लोकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. या परीक्षेत पाटणा येथील रहिवासी असलेल्या श्रीजा हिने 99.4% गुण मिळवून बिहारमध्ये पहिला नंबर (Bihar Topper) आणला आहे. राजवंशीनगर येथील डीएव्ही शाळेची विद्यार्थिनी श्रीजा हिला संस्कृत आणि विज्ञान विषयात 100 गुण मिळाले आहेत. त्याचवेळी तिला एसएसटीमध्ये 99, गणितात 99 आणि इंग्रजीत 99 गुण मिळाले आहेत. या यशाचे श्रेय श्रीजाने तिचे आजोबा, आजी, मामा, मावशी यांना दिले आहे. श्रीजा तिच्या आजी आजोबांसोबत राहते. याचे कारण म्हणजे श्रीजा पाच वर्षांची असताना तिच्या धाकट्या बहिणीचा जन्म झाला. प्रसूतीदरम्यान तिच्या आईचा मृत्यू झाला. श्रीजाच्या वडिलांना मुलगी आवडत नव्हती म्हणून त्यांनी तिला घरातून हाकलून दिले आणि पुन्हा दुसरं लग्न केले. तेव्हापासून श्रीजा तिच्या आजी-आजोबांच्या घरी राहू लागली. जी मुलगी वडिलांवर ओझे होती, ती आज बिहार टॉपर झाली आहे. श्रीजा म्हणाली की तिला आई-वडिलांची कमतरता कधीच जाणवली नाही. आजी-आजोबांनी तिला इतकं प्रेम दिलं की ती आई-वडिलांशिवाय आहे, असं तिला कधीच वाटलं नाही, असं ती म्हणाली. इंजिनियर्ससाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये बंपर भरती श्रीजा म्हणाली की ती कधीच वेळ पाहून अभ्यास करत नाही, तर दिवसभर मन लावून अभ्यास करते. श्रीजाचा आवडता विषय गणित आहे, तर तिला एसएसटीची सर्वाधिक भीती वाटत होती, पण तिने इतके कष्ट केले की तिला गणित आणि एसएसटी या दोन्ही विषयांत 99 गुण मिळाले. श्रीजा म्हणाली की, मी बिहारमध्ये अव्वल ठरेन अशी अपेक्षा नव्हती, पण आता मला चांगलं वाटत आहे. श्रीजाच्या आजी कृष्णा देवी सांगतात की, माझ्या मुलीच्या मुलीमुळे आज लोक मला ओळखत आहेत याचा मला खूप आनंद होत आहे. लहानपणीच अशा आश्वासक मुलीला घरातून हाकलून देणार्‍या बापाचे मला खूप वाईट वाटते. त्याचवेळी श्रीजाच्या आजोबांनी सांगितले की, मी आधी तीन मुलींचा बाप होतो, पण आता श्रीजा आणि तिची धाकटी बहीणही एकत्र राहतात, त्यामुळे आता मी पाच मुलींचा बाप आहे. मला अभिमान आहे की माझी मुलगी आज माझे नाव अभिमानाने उंचावत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या