JOIN US
मराठी बातम्या / करिअर / CAT Exam 2022: परीक्षेसाठी अवघे काही दिवस शिल्लक; Exam पॅटर्न माहिती आहे ना?

CAT Exam 2022: परीक्षेसाठी अवघे काही दिवस शिल्लक; Exam पॅटर्न माहिती आहे ना?

IIM मध्ये MBA साठी प्रवेश मिळतो, तसेच CAT स्कोअरच्या आधारे तुम्ही इतर व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये देखील प्रवेश घेऊ शकता.

जाहिरात

अशा पद्धतीन करा अभ्यास

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 नोव्हेंबर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बंगलोर 27 नोव्हेंबर रोजी सामाईक प्रवेश परीक्षा, CAT 2022 आयोजित करेल. CAT ही CBT चाचणी म्हणून देशभरातील 150 शहरांमध्ये घेतली जाईल. परीक्षेला बसण्यासाठी कॅट परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी प्रवेशपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. CAT प्रवेशपत्र 27 ऑक्टोबर रोजी ऑनलाइन पद्धतीने जारी केले जाईल. ज्या उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी CAT अर्ज भरला आहे ते CAT आयडी आणि पासवर्ड वापरून अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर CAT प्रवेशपत्र 2022 डाउनलोड करू शकतील. CAT म्हणजे नक्की काय? कोणत्याही IIM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या एमबीए प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतलेल्या प्रवेश परीक्षेला CAT म्हणतात. CAT चा पूर्ण फॉर्म कॉमन अॅडमिशन टेस्ट आहे, ही प्रवेश परीक्षा आयआयएमद्वारे घेतली जाते. जर तुम्ही CAT च्या निवड प्रक्रियेत यशस्वी झालात, तर तुम्हाला कोणत्याही IIM मध्ये MBA साठी प्रवेश मिळतो, तसेच CAT स्कोअरच्या आधारे तुम्ही इतर व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये देखील प्रवेश घेऊ शकता. क्षणभरात गेली नोकरी; ट्विटरनंतर ‘या’ कंपनीनंही भारतातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं; नक्की चाललंय काय? CAT साठीची पात्रता जर तुम्हाला CAT द्यायची असेल तर तुमच्याकडे किमान 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. (ST SC आणि PDW साठी पदवीमध्ये किमान 45% गुण अनिवार्य आहे) ही परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा नाही. पदवीच्या अंतिम वर्ष/सेमिस्टरमधील विद्यार्थी देखील CAT साठी अर्ज करू शकतात परंतु जर त्यांनी अनिवार्य (50% किंवा 45%) पदवी पूर्ण केली नाही तर CAT परीक्षेसाठी त्यांचा अर्ज वैध राहणार नाही. Government Jobs: 10वी पास असो वा ग्रॅज्यूएट्स DRDO मध्ये 1061 जागांसाठी मेगाभरती; ही घ्या डायरेक्ट लिंक असं असेल CAT परीक्षेचं पॅटर्न परीक्षा- CBT मोड परीक्षेचा कालावधी- 120 मिनिटे विभागांची संख्या – 3 – DI LR, VA RC, QA एका विभागासाठी वेळ - प्रत्येक विभागासाठी 40 मिनिटे निगेटिव्ह मार्किंग- होय प्रत्येक प्रश्न तीन गुणांचा असतो. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या