JOIN US
मराठी बातम्या / करिअर / career tips : दहावीनंतर कोणती शाखा निवडावी? जाणून घ्या 5 'बेस्ट करिअर ऑप्शन्स'

career tips : दहावीनंतर कोणती शाखा निवडावी? जाणून घ्या 5 'बेस्ट करिअर ऑप्शन्स'

आवडीच्या करिअरची निवडीसाठी योग्य अभ्यासक्रमाची निवड करणं हा आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा निर्णय असतो.

जाहिरात

आवडीच्या करिअरची निवडीसाठी योग्य अभ्यासक्रमाची निवड करणं हा आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा निर्णय असतो.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 मे : माणसाच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला (Education) अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग्य वयात योग्य शिक्षण घेतलं तर आयुष्यभराचा प्रश्न सुटतो. कारण, आपली नोकरी (Job) किंवा व्यवसाय (Business) या गोष्टी आपण कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतो त्यावर अवलंबून असतो. इयत्ता दहावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातला महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा आहे. दहावी पूर्ण झाल्यानंतर आपण कुठली शाखा निवडतो त्यावर आपलं उच्च शिक्षण अवलंबून असतं. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासह (CBSE) विविध राज्यांतल्या 10वी बोर्डाच्या (10th Board Exam) परीक्षा संपल्या आहेत. आता विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘10वी नंतर पुढे काय?’ हा करिअरच्या संदर्भातला सर्वांत मोठा प्रश्न बहुतांश विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही हा प्रश्न पडतो. आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी कोणता विषय किंवा कोणती शाखा योग्य ठरेल, या संभ्रमामध्ये पालक असतात. विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि अभ्यासाची क्षमता लक्षात घेऊन योग्य त्या अभ्यासक्रमाची निवड केली पाहिजे. पालकांनीदेखील आपल्या मुलांच्या आवडीचा आदर केला पाहिजे, जेणेकरून तो/ती भविष्यात चांगली कामगिरी करू शकेल. काही विद्याशाखांची दहावीनंतर जास्तीत जास्त विद्यार्थी निवड करतात. त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, याबद्दल मार्गदर्शन करणारं वृत्त ‘फायनान्शिअल एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केलं आहे. पॉलिटेक्निक कोर्स दहावीनंतर विद्यार्थी मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, कॉम्प्युटर, ऑटोमोबाइल अशा पॉलिटेक्निक (Polytechnic) अभ्यासक्रमांची निवड करू शकतात. यामध्ये महाविद्यालयं 3 वर्षं, 2 वर्षं आणि एका वर्षाचे पदविका अभ्यासक्रम चालवतात. या डिप्लोमा कोर्सचा फायदा म्हणजे, कमी काळात सर्वसाधारण पगाराच्या नोकऱ्या सहज मिळतात. पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या, सरकारी क्षेत्रातल्या नोकऱ्या, उच्च शिक्षण, स्वतःचा व्यवसाय यांसारखे अनेक पर्याय (Career Options) उपलब्ध आहेत. आयटीआय (इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (ITI) ही औद्योगिक प्रशिक्षण केंद्रं असतात. ज्या विद्यार्थ्यांना शाळा पूर्ण केल्यानंतर लवकर आणि सहज रोजगार हवा आहे त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. या कोर्समध्ये कमी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक अभ्यासक्रम शिकवला जातो. आयटीआयमधल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना औद्योगिक कौशल्यांचं प्रशिक्षण मिळतं आणि ते त्याच क्षेत्रात काम करू शकतात. आयटीआय केल्यानंतर पीडब्ल्यूडीसारख्या सार्वजनिक क्षेत्रात नोकरी, खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या, स्वयंरोजगार, परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. विज्ञान (Science) सध्याच्या काळात पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये हा ऑप्शन सर्वांत जास्त लोकप्रिय आहे. विज्ञान शाखा निवडण्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे बारावीनंतर तुम्ही इच्छा असल्यास वाणिज्य (Commerce) किंवा कला (Arts) शाखेमध्येही जाऊ शकता. विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र हे मुख्य विषय असतात; पण अनेक विद्यार्थ्यांना गणित आवडत नाही किंवा तुम्हाला जर वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर तुम्ही गणित वगळता इतर विषयांची निवड करू शकता. बारावीनंतर विज्ञान शाखेतल्या विद्यार्थ्यांसाठी करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. इंजिनीअरिंग, मेडिकल, रिसर्च अशा क्षेत्रांमध्ये विज्ञान शाखेचे विद्यार्थी करिअर करू शकतात. या विद्यार्थ्यांना बीटेक, बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS), बॅचलर ऑफ फार्मसी, बॅचलर ऑफ मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बीएस्सी होम सायन्स किंवा फॉरेन्सिक सायन्स अशा पदव्या मिळवता येतात. वाणिज्य (Commerce) विज्ञान शाखेनंतर वाणिज्य हा दुसरा सर्वांत लोकप्रिय करिअर पर्याय आहे. ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्हाला अर्थशास्त्र आवडत असेल तर वाणिज्य शाखेमध्ये तुम्ही चांगली कामगिरी कराल. यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट, एमबीए, बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक असे करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. या क्षेत्रांमध्ये जाण्यासाठी तुम्हाला अकाउंटन्सी, फायनान्स आणि इकॉनॉमिक्सची माहिती असली पाहिजे. वाणिज्य शाखेतल्या विद्यार्थ्यांना हेच शिकवलं जातं. वाणिज्य शाखेत शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट, बिझनेस मॅनेजमेंट, अ‍ॅडव्हर्टायझिंग अँड सेल्स मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अशा क्षेत्रांत संधी उपलब्ध होतात. आर्ट्स (Arts) ज्या विद्यार्थ्यांना अ‍ॅकॅडमिक रिसर्चमध्ये आवड आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी कला शाखा हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही सर्जनशील असाल तर कला शाखा हा तुमच्यासाठी योग्य मार्ग आहे. कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल हे मुख्य विषय असतात. प्रॉडक्ट डिझायनिंग (Product Designing), मीडिया आणि जर्नालिझम (Media/Jurnalism), फॅशन टेक्नॉलॉजी (Fashion Technology), व्हिडिओ क्रिएशन आणि एडिटिंग (Video Creation and Editing) आणि एच आर ट्रेनिंग, स्कूल टीचिंग असे किती तरी पर्याय कला शाखेतल्या विद्यार्थ्यांना निवडता येतात. आवडीच्या करिअरची निवडीसाठी योग्य अभ्यासक्रमाची निवड करणं हा आयुष्यातला सर्वांत महत्त्वाचा निर्णय असतो. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय कमी वेळेत यश मिळवण्यास मदत करतो. त्यामुळं दहावीनंतर अभ्यासक्रमाची काळजीपूर्वक निवड करावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या