शेफ होण्यासाठी तुम्हाला कामी येणारे कोर्सेस आणि टॉप कॉलेजेस
मुंबई, 14 मार्च: भारतात अन्नपदार्थ आणि ते बनवण्याच्या विविध पद्धती आहेत. घरी आलेल्या पाहुण्यांना कधीही उपाशी न पाठवण्याची पद्धत आपल्या देशात आहेत. त्यात एकापेक्षा एक मोठे खवैय्येही आपल्या देशात आहेत. अगदी वरण-भात ते मटणाच्या भाजीपर्यंत सर्व पदार्थांचे चाहते इथे आहेत. मात्र भारतातील लोकांना जितकी खाण्याची आवड आहे तितकीच आवड जेवण बनवण्याचीही (Food verity in India) आहे. तुम्हीही यातीलच एक असाल आणि तुम्हालाही जेवण बनवण्याची प्रचंड आवड असेल तर तुम्ही तुमची आवड करिअर (career in Hotel management) बनवू शकता. Chef म्हणून करिअर (How to be a Chef) घडवू शकता. शेफ होण्यासाठी तुम्हाला कामी येणारे कोर्सेस आणि टॉप कॉलेजेस (Top colleges and courses to become chef in India) याबद्दल आज आम्ही माहिती देणार आहोत. डिप्लोमा कोर्सेस डिप्लोमा – कलिनरी आर्ट्स/ फ़ूड प्रोडक्शन/ कैटरिंग टेक्नोलॉजी/ फ़ूड एंड बेवरीज सायन्स/ बेकरी अँड कन्फेक्शनरी सर्टिफिकेशन कोर्सेस सर्टिफिकेट – फ़ूड प्रोडक्शन/ कैटरिंग टेक्नॉलॉजी/ फ़ूड बेवरेजेज. क्राफ्ट्समैनशिप कोर्स – फ़ूड अँड बेवरीज सर्विस/ फ़ूड प्रोडक्शन/ फ़ूड प्रोडक्शन अँड पेस्ट्री विद्यार्थ्यांनो, परीक्षेदरम्यान खाण्या-पिण्याकडे द्या लक्ष; असा ठेवा आहार डिग्री कोर्सेस BA कलिनरी आर्ट्स/ होटल मॅनेजमेंट/ कैटरिंग टेक्नॉलॉजी अँड कलिनरी आर्ट्स. BSc कैटरिंग अँड कलिनरी आर्ट्स, होटल मॅनेजमेंट अँड कैटरिंग टेक्नोलॉजी. बॅचलर ऑफ़ होटल मॅनेजमेंट (BHM). ही आहेत देशातील टॉप कॉलेजेस इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन, नवी दिल्ली/अहमदाबाद/गोवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, औरंगाबाद दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, नवी दिल्ली एमिटी स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी, नोएडा ओरिएंटल स्कूल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई/ दिल्ली/ वडोदरा ओबेरॉय सेंटर ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट, नवी दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, डेहराडून/ भोपाळ/ गुवाहाटी/ जयपूर/ कोलकाता/ हैदराबाद/ कुफरी चंदीगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट क्या बात है! आता घरबसल्या करा बँकेच्या परीक्षांची तयारी; ‘या’ टिप्सचं करा पालन इतका असतो पगार आपल्या देशात, सुरुवातीला इंटर्न शेफला सुमारे 10 हजार रुपये मासिक मिळतात आणि नवीन व्यावसायिक शेफला सरासरी 18 - 20 हजार रुपये मासिक मिळतात. या क्षेत्रातील काही वर्षांच्या कामाच्या अनुभवानंतर या व्यावसायिकांना सरासरी 50-60 हजारांचे मासिक वेतन पॅकेज मिळते. एखाद्या सुप्रसिद्ध हॉटेल किंवा मेजवानीत तज्ञ आणि अनुभवी शेफला महिन्याला सरासरी 1 लाख रुपयांपर्यंत पगाराचं पॅकेज मिळतं.