लगेच मिळेल नोकरी
मुंबई, 26 ऑक्टोबर: कुठलाही जॉब म्हंटलं की उमेदवारांना त्या कंपनीकडून काही अपेक्षा असतात, तसंच त्या कंपनीलाही उमेदवारांकडून अपेक्षाअसतात. एखाद्या कंपनीत जॉब मिळवण्यासाठी उमेदवारांकडे अनेक प्रकारचे स्किल्स असणं आवश्यक आहे. काही कम्पन्या उमेदवारांमध्ये त्यांना हवे ते स्किल्स बघतात. तर काही कंपन्या कॉमन स्किल्स आणि तुमचा आत्मविश्वास बघतात. एकूणच काय तर मुलाखत घेणाऱ्यांना तुमच्याकडून काही अपेक्षा असतात त्या तुम्ही पूर्ण करू शकले तरच तुम्हाला जॉब मिळण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्किल्सबद्दल सांगणार आहोत जे मुलाखत देताना तुमच्याकडे असणं आवश्यक आहेत. चला तर मग जाणून घेऊया. मोठी खूशखबर! MPSC टेक्निकल सर्व्हिस अंतर्गत तब्बल 378 पदांसाठी भरती; अर्जाची आजची शेवटची तारीख कम्युनिकेशन हा कोणत्याही कामाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. व्यक्ती एक चांगला श्रोता तसेच एक चांगला संभाषणकर्ता असणे आवश्यक आहे ज्याच्याकडे प्रभावीपणे माहिती लेखी आणि तोंडी व्यक्त करण्याची क्षमता आहे. म्हणूनच कंपन्यांना एक असा उमेदवार पाहिजे असतो ज्याच्याकडे चांगले कम्युनिकेशन स्किल्स असतील. जो क्लायंटशी उत्तमपणे बोलू शकेल आणि त्यांना आपले म्हणणे पटवून देऊ शकेल. ना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट; तब्बल 75,000 रुपये पगार; ‘या’ ऑर्डनन्स फॅक्टरीत Vacancy आजकाल बहुतांश नोकऱ्यांसाठी उमेदवारांना संगणकाचे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, विशेषत: ईमेल, स्प्रेडशीट्स आणि वर्ड प्रोसेसिंगच्या संदर्भात काही मूलभूत समज असणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांना टेक्निकल ज्ञान भरपूर आहे अशा उमेदवारांनाच नोकरी देण्यात येते. म्हणूनच उमेदवारांकडे टेक्निकल ज्ञान असणे आवश्यक आहे. कोणतीही कंपनी अशा उमेदवारांना निवडू इच्छित नाहीत ज्यांच्याकडे आत्मविश्वास नसेल. मुलाखतीदरम्यान तुमच्या बोलण्यावरून मुलाखत घेणाऱ्यांना तुमच्यातील आत्मविश्वासाबद्दल समजते. म्हणूनच जर तुम्ही मुलाखतीत आत्मविश्वासानं बोललात तरच तुम्हाला नोकरी मिळू शकते. ITBP Recruitment: 12वी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्यात नोकरीची मोठी संधी; करा अर्ज कंपनीत काम करण्यासाठी एक पॉझिटिव्ह उमेदवारांची गरज असते. जर तुमच्या बोलण्यातून तुमचे विचार पॉझिटिव्ह आहेत आणि हार मानणाऱ्या पैकी नाहीत असं लक्षात आलं तर तुम्हाला चांगला जॉब मिळू शकतो.