5. स्टडी रूममध्ये अभ्यास करताना हे ध्यानात ठेवावे की, तुमचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा.
मुंबई, 07 एप्रिल: भारतीय उमेदवारांची योग्यता मोजण्यासाठी ही एक चाचणी (Test) आहे ज्याद्वारे निवडलेल्या उमेदवारांना महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर शिक्षक (Teachers Jobs BY NET Exam) म्हणून नियुक्त केले जाते. तुम्हाला देशातील कोणत्याही विद्यापीठात, महाविद्यालयात आणि इतर शैक्षणिक संशोधनात प्रवेश घ्यायचा असेल तर ही (UGC NET Exam) परीक्षा देणं आवश्यक आहे. म्हणूनच देशातील लाखो उमेदवार हे या परीक्षेची तयारी करत असतात. जर तुम्हालाही या परीक्षेसाठी अभ्यास (How to prepare for UGC NET Exam) सुरु करायचा असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला UGC NET परीक्षेचं पॅटर्न (UGC NET Exam Pattern) सांगणार आहोत आणि या परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा हेही सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. UGC NET क्लिअर करणे हे उमेदवारांसाठी एक आव्हानात्मक काम आहे कारण ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी उमेदवारांची चांगली तयारी असणे आवश्यक आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना या काही टिप्स महत्त्वाच्या टिप्स आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनो, परदेशात शिक्षणाच्या नावावर होऊ शकते फसवणूक; जाण्याआधी चेक करा ‘या’ गोष्टी मागील प्रश्नपत्रिका बघा जर तुम्ही UGC NET 2021 च्या परीक्षेला बसणार असाल तर परीक्षेच्या तयारीसाठी, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचे लक्षात ठेवा जेणेकरुन त्यांना कोणत्या विषयातून प्रश्न विचारले जातात तसेच प्रश्नांच्या प्रकाराची कल्पना येईल. तसेच कोणते प्रश्न परत परत विचारले जातात याचीही कल्पना येईल. मॉक टेस्टवर लक्ष केंद्रित करा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही नियमित मॉक टेस्ट देणे आवश्यक आहे. मॉक टेस्टचा प्राथमिक उद्देश उमेदवारांना परीक्षेच्या पॅटर्नची कल्पना मिळावी, एवढेच नाही तर उमेदवारांना UGC NET मॉक टेस्ट देताना वेळ मर्यादेचे पालन करून टाइम मॅनेजमेंटचा सराव करता येईल. महत्त्वाच्या विषयांची यादी बनवा UGC-NET इच्छुक व्यक्तीने महत्त्वाच्या विषयांची यादी बनवून त्या विषयांतील महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव केला पाहिजे. त्यामुळे त्यांना परीक्षेची तयारी वेगाने करण्यास मदत होईल. महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास आधी केला तर परीक्षा पास करण्यात मदत होऊ शकते. UPSC Tips: उमेदवारांनो, UPSC ची मुलाखत देण्याआधी वाचा टिप्स; नक्की व्हाल IAS करंट अफेअर्सवर द्या लक्ष
विद्यार्थ्यांना सध्याच्या घडामोडींची माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांनी वर्तमानपत्रे रोज वाचावीत. पेपर एक मधील सामान्य ज्ञान विभाग चालू घडामोडींवर आधारित आहे, त्यामुळे जगभरात नक्की काय चालले आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.