JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: News Anchor होऊन टीव्हीवर झळकायचंय? मग असं करा तुमचं स्वप्न पूर्ण; जाणून घ्या माहिती

Career Tips: News Anchor होऊन टीव्हीवर झळकायचंय? मग असं करा तुमचं स्वप्न पूर्ण; जाणून घ्या माहिती

म्हणूनच न्यूज अँकर होण्यासाठी तुमच्याकडे नक्की कोणते स्किल्स असणं आवश्यक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

जाहिरात

तुमच्याकडे नक्की कोणते स्किल्स असणं आवश्यक जाणून घेऊया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 11 जानेवारी: आजकालच्या काळात पत्रकारितेत (Career in Journalism) ग्लॅमर आला आहे. काही मोठ्या वृत्तसंस्थांच्या अँकर्सकडे किंवा रिपोर्टर्सकडे बघून अनेक तरुण तरुणींना पत्रकारितेत करिअर (Career as journalists) करण्याची इच्छा आहे. त्यात सर्वांना न्यूज अँकर व्हायचंय. न्यूज अँकर म्हणजेच टीव्हीवर बातमी देणारा किंवा देणारी पत्रकार. आता तुम्ही म्हणाल बारावीनंतर पत्रकारिता करण्यासाठी अनेक कोर्सेस (Courses for Journalism) उपलब्ध आहेत तसे न्यूज अँकर (News Anchor) होण्यासाठीही कोर्सेस (Courses for becoming News Anchor) आहेत का? तर असे कोर्सेस ऑनलाईन (Online courses in Journalism) असू शकतात मात्र असा कोणताही डिग्री कोर्स नाही. पत्रकारिता शिकतानाच तुमच्या अंगी काही गुण (Skills for News Anchor) असतील तर तुम्ही एक प्रतिष्ठित न्यूज अँकर होऊ शकता. एक चांगला न्यूज अँकर (How to become good news Anchor) होऊन तुम्हीही संपूर्ण जगासमोर आपली क्षमता दाखवू शकता आणि प्रसिद्ध होऊ शकता. जर तुम्हाला जर्नलिझम किंवा मास कम्युनिकेशन (Journalism and Mass Communication) कोर्सची पदवी घेऊन न्यूज अँकर बनायचं असेल तर तुम्हाला या व्यवसायासाठी आवश्यक स्किल्स (Skills for TV Anchor) देखील माहित असणं आवश्यक आहे. नुसती पदवी घेऊन वेगळी ओळख निर्माण करता येत नाही. न्यूज अँकर होण्यासाठी, तुमच्याकडे प्रभावी बोलण्याचं कौशल्य आणि चांगलं व्यक्तिमत्व (News Anchor Skills) असणं आवश्यक आहे. म्हणूनच न्यूज अँकर होण्यासाठी तुमच्याकडे नक्की कोणते स्किल्स असणं आवश्यक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. MPSC Group C Exam: उमेदवारांनो, परीक्षेसाठी अर्ज केलात ना? उद्याची शेवटची तारीख न्यूज अँकर होण्यासाठी ‘ही’ पात्रता आवश्यक (Eligibility for News Anchors) अँकर होण्यासाठी पत्रकारितेत पदवी किंवा डिप्लोमा (जर्नालिझम कोर्स) पूर्ण केला असणं अनिवार्य आहे. तसंच इतरही काही पात्रता असणं आवश्यक आहे. ते जाणून घेऊया. न्यूज अँकर होण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. उमेदवाराकडे पत्रकारिता अभ्यासक्रम किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. न्यूज अँकर होण्यासाठी उमेदवारांनी ब्रॉडकास्ट मीडिया जॉब्समध्ये बॅचलर डिग्री उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे. न्यूज अँकर होण्यासाठी उमेदवारांकडे आवश्यक स्किल्स जसं न्यूज सेन्स, बोलण्याची क्षमता असणं आवश्यक आहे. न्यूज अँकर होण्यासाठी हे स्किल्स असणं आवश्यक (Skills Required to become News Anchor) न्यूज अँकर होणं तसं सोपी नाही. कोणतीही बातमी ठामपणे आणि उत्तमपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही न्यूज अँकरची असते. म्हणूनच न्यूज अँकर हे सर्वात जबाबदारीचं पद आहे. म्हणूनच यासाठी तुमच्यामध्ये काही महत्त्वाचे स्किल्स असणं आवश्यक आहे. जाणून घेऊया या स्किल्सबद्दल. उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक. न्यूज अँकर होण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि संयम असणं आवश्यक आहे. न्यूज अँकर होण्यासाठी उमेदवारांनीनी कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वास बाळगणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम आवाज आणि स्पष्ट बोलण्याची कला असणं आवश्यक आहे. देशाच्या आणि जगाच्या महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती असणं आवश्यक आहे. Career Tips: Work From Home करताना तणावात आहात? चिंता नको. या टिप्स येतील कामी लक्षात ठेवा, या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात. आधी पत्रकारितेत संपूर्ण अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला न्यूज अँकर होण्याची संधी मिळू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या