BSF Recruitment 2022: 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, BSF हेड कॉन्स्टेबल पदांसाठी बंपर भरती, कसा करायचा अर्ज पाहा
मुंबई, 18 ऑगस्ट: तुम्हाला सीमेवर जाऊन देशाची सेवा करायची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF) हेड कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी भरती (BSF Head Constable Recruitment 2022) होणार आहे. लवकरच BSF कडून ऑनलाइन अर्ज मागवले जाणार आहेत. BSF मध्ये हेड कॉन्स्टेबल, रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिक या पदांसाठी एकूण 1300 हून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतील. BSF हेड कॉन्स्टेबल भर्ती 2022 लघु अधिसूचनेनुसार, हेड कॉन्स्टेबल RO भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 20 ऑगस्टपासून सुरू होतील. पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 19 सप्टेंबर 2022 पर्यंत वेळ देण्यात येईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. रिक्त जागांचा तपशील:
हेही वाचा- ‘चला IT वाल्यांनो ऑफिसला हजर राहा’; देशातील ‘या’ 4 कंपन्यांचं WFH लवकरच होणार बंद; तुमची कंपनी तर नाही ना? शैक्षणिक पात्रता- हेड कॉन्स्टेबल आरओ पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारानं मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक (इयत्ता 10 वी) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय रेडिओ आणि टेलिव्हिजन/ इलेक्ट्रॉनिक्स/ कंप्यूटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट / डेटा प्रीपरेशन आणि कंप्युटर सॉफ्टवेअर/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/ डेटा एंट्री ऑपरेटर प्रमाणपत्र मिळवणं आवश्यक आहे. किंवा किमान 60 टक्के गुणांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह 12वी उत्तीर्ण असायला हवं. तर हेड कॉन्स्टेबल RM पदासाठी उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील ITI प्रमाणपत्र असावं किंवा PCM सह 12वी मध्ये किमान 60 टक्के गुण असावेत. वयोमर्यादा- पात्र उमेदवारांचे वय 18 सप्टेंबर 2022 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 25 वर्षे असावं. तथापि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अधिक तपशीलांसाठी सूचना काळजीपूर्वक वाचा. अर्जासाठी शुल्क- जनरल, OBC किंवा EWS श्रेणीतील उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावं लागेल तर SC, ST, दिव्यांग आणि सर्व महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावं लागणार नाही.