JOIN US
मराठी बातम्या / करिअर / 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली; आता या दिवशी होईल परीक्षा

5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली; आता या दिवशी होईल परीक्षा

इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exam postponed in Maharashtra) राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जाहिरात

शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जुलै: जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात संथ गतीने येणाऱ्या मान्सूनने आता राज्याच्या सर्वच भागात हजेरी लावली आहे. आधी काहीसा संथ आणि कमी पडणारा पाऊस आता मुसळधार (Heavy rain in Maharashtra) पडू लागला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये अति मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अनेक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. त्यात आता हवामान विभागानं पुणे, काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे, पालघर या जिल्ह्यामधील शाळांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र आज एक मोठा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Exam postponed in Maharashtra) राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना भर पासवसत परिक्षा देण्यासाठी जावं लागणार नाहीये. ही शिष्यवृत्ती परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात आली आहे . एक परिपत्रक काढून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. आता कधी होणार परीक्षा? पूर्व उच्च प्राथामिक शिष्यवृती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व मारध्यामक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) हो दि. 20/07/2022 रोजी राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहीर करण्यात आलं होतं. मात्र सधस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती आणि बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्याथ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्याथी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर परीक्षा दि.20/07/2022 ऐवजी रक्वार दि. 31/07/2022 रोजी येण्यात येणार आहे. पुढचे दोन दिवस 5 जिल्हांना रेड अलर्ट पाच जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट (Red Alert in five District) जारी केला आहे. यात पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या