मुंबई, 25 मार्च: करोना महासाथीची तिसरी लाटही आता संपुष्टात आली आहे आणि झपाट्याने रुग्णसंख्या घटत आहे. त्यामुळे हळूहळू आयटी क्षेत्रातल्या कंपन्या आता कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम (Work From Home) या पद्धतीऐवजी वर्क फ्रॉम ऑफिस (Work From Office) या जुन्या पद्धतीकडे वळवू पाहत आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज या कंपन्या कामाचं हायब्रीड मॉडेल राबवत आहेत. टीसीएसच्या (TCS) मते, जगभरात कोविड 19-ची (Covid19) परिस्थिती सुधारत आहे. आता आमच्या कंपन्यांतल्या बऱ्याचशा असोसिएट्सचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे आम्ही हायब्रिड पद्धतीने (Hybrid Work Model) काम करत आहोत. परंतु लवकरच येत्या काही महिन्यांत आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा विचार करत आहोत. आत्ताच काही कंपन्या त्यांच्या अधिकाऱ्यांना आपापल्या ऑफिसात जाऊन काम करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. सीनिअर मॅनेजमेंट पातळीवरच्या एक्झिक्युटिव्हजनी तर दररोज ऑफिसमध्ये जाऊन काम करायला सुरुवात केली आहे. कामाच्या हायब्रीड पद्धतीबद्दल सांगताना टीसीएस कंपनीतर्फे सांगण्यात आलं, की त्यांनी 25×25 मॉडेलचा अवलंब केला आहे. त्यामध्ये कोणत्याही वेळी 25 टक्के असोसिएट्सनी ऑफिसमध्ये हजर असतील. परंतु त्यांनी ऑफिसमधल्या कामासाठीच्या कालावधीतला 25 टक्के वेळच ऑफिसमध्ये असणं गरजेचं आहे. बाकीच्या वेळात ते कुठूनही काम करू शकतील; पण या मॉडेलमधला महत्त्वाचा भाग म्हणजे कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष ऑफिसमध्ये आणणं आणि त्यानंतर हळूहळू हायब्रीड पद्धतीकडे वळवणं. तुम्हालाही ऑफिसमध्ये इतरांशी बोलण्याची भीती वाटते का? चिंता नको; या टिप्समुळे व्हाल बिनधास्त कंपनीने आता ऑकेजनल ऑपरेटिंग झोन्स (OOZ) आणि हॉट डेस्क्स तयार केले आहेत. या OOZमुळे असोसिएट्स देशातल्या कोणत्याही ऑफिसमध्ये आपली सिस्टीम सुरू करून ग्लोबल वर्कफोर्सशी जोडले जाऊ शकतात. तंत्रज्ञान उद्योगातली आणखी एक मोठी कंपनी असलेल्या एचसीएल टेक्नॉलॉजीनेसुद्धा हायब्रीड पद्धतीचा अवलंब केला आहे. एचसीएलच्या प्रवक्त्याने सांगितलं, की कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कंपनीसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. त्याचबरोबर आपला उद्योग करोनापूर्व पद्धतीनेच नेहमीसारखाच सुरू राहील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सध्या एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही हायब्रिड पद्धतीनेच काम करत आहोत. इन्फोसिस (Infosys) कंपनीकडून याआधी असं सांगण्यात आलं होतं, की ते आता, रिटर्न टू ऑफिस या फेजसाठी नियोजन करत आहेत. त्यामध्ये ते कर्मचाऱ्यांना आठवड्यातला एखाद-दुसरा दिवस ऑफिसमध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करतात. इन्फोसिसचे एचआर हेड आणि एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट रिचर्ड लोबो म्हणाले, की करोनाच्या सध्याच्या स्थिर आणि समतल स्थितीचा विचार करता रिटर्न टू ऑफिस या फेजनंतर आम्ही हायब्रिड मॉडेलमध्ये सुमारे 40-50टक्के कर्मचारी ऑफिसमध्ये येऊन काम करतील अशी आशा करत आहोत. कॉग्निझंट (Cognizant) या आणखी एका टेक कंपनीनेसुद्धा कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्यक्ष ऑफिसमधल्या कामाला साधारण एप्रिल 2022पासून सुरुवात होईल, असा विश्वास व्यक्त केला. उमेदवारांनो, आता तुम्हाला कोणीही नाकारू शकणार नाही Job; असा बनवा प्रभावी Resume आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतामध्ये सध्या कोविड19ची सक्रिय रुग्णसंख्या घटून ती 22,427 वर आली आहे. कालच्या (23 मार्च) एका दिवसात 1938 नवे करोनाबाधित आढळले आणि 67 झाले. त्यामुळे भारताची आतापर्यंतच्या कोविड केसेसची एकूण आकडेवारी 4,30,14,687 इतकी झाली असून, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 5,16,672 इतकी झाली आहे.