JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Air Force Career: वायुसेनेत Flying Officer झालात तर करिअर सेट; पण जॉब मिळेल कसा? महिती एका क्लिकवर

Air Force Career: वायुसेनेत Flying Officer झालात तर करिअर सेट; पण जॉब मिळेल कसा? महिती एका क्लिकवर

तुम्हालाही भारतीय वायुसेनेत Class1 Officer (Class 1 Officer hobs in IAF) म्हणून नोकरी हवी असेल तर आज आम्ही तुम्हाला अशी परीक्षा सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करू शकता.

जाहिरात

वायुसेनेत Class1 Officer Job

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट: आयुष्यात सरकारी नोकरी (Government Jobs in Maharashtra) मिळावी यासाठी हजारो तरुण-तरुणी अभ्यास करत असतात. त्यात जर सेंट्रल गर्व्हन्मेन्टमध्ये जॉब मिळाला तर पर्वणीच. काही तरुणांना भारतीय सेनेतही दाखल होण्याची इच्छा असते. यासाठी NDA सारख्या मोठ्या परीक्षांची तयारी अनेक जण करत असतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी परीक्षा देणं महत्त्वाचं असतं आणि यासाठी अभ्यास करावा लागतो. कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये क्लास वन ऑफिसर म्हणून नोकरी करण्यासाठी प्रचंड अभ्यास आणि मेहनत करावी लागते. जर तुम्हालाही भारतीय वायुसेनेत Class1 Officer (Class 1 Officer hobs in IAF) म्हणून नोकरी हवी असेल तर आज आम्ही तुम्हाला अशी परीक्षा सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करू शकता. चला तर जाणून घेऊया. AFCAT असं या परीक्षेचं नाव आहे. ही परीक्षा देऊन तुम्ही भारतीय वायुसेनेत (Indian Air Force Jobs) Class1 Officer होऊ शकता. या परीक्षेसाठीची पात्रता काय? ही परीक्षा नेमकी कशी असते? कोणते उमेदवार (Eligibility for AFCAT Exam) ही परीक्षा देऊ शकतात? या तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. पुण्यात नोकरी हवीये? मग ही संधी हातची जाऊ देऊ नका; ग्रॅज्युएट्सना थेट जॉब्स

AFCAT म्हणजे नक्की काय?

भारतीय वायुसेनेद्वारे घेण्यात येणारी ही परीक्षा हवाई दलातील वर्ग-I अधिकारी (फ्लाइंग आणि ग्राउंड ड्यूटी) उमेदवारांच्या निवडीसाठी घेतली जाते. ही परीक्षा साधारणपणे दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये घेतली जाते, या परीक्षेत उमेदवारांना उड्डाण शाखा, तांत्रिक शाखा आणि ग्राउंड ड्युटी शाखेसाठी नियुक्त केले जाते. या परीक्षेत, तांत्रिक आणि गैर-तांत्रिक अशा दोन्ही पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते, ज्यामध्ये शॉर्ट कमिशन आणि कायम कमिशनचा समावेश आहे जो पुरुष आणि महिला दोघांसाठी असतो. कोणत्या ब्रांचसाठी काय पात्रता आवश्यक फ्लाइंग ब्रांच - अभ्यासक्रम सुरू करताना उमेदवाराचं वय हे 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विषयातील पदवीधर (किमान तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम) सर्व पेपर्समध्ये एकूण किमान 60% गुणांसह आणि 10+2 स्तरावर गणित आणि भौतिकशास्त्र उत्तीर्ण किंवा BE/B.Tech केलं असणं आवश्यक आहे. टेक्निकल ब्रांच - अभ्यासक्रम सुरू करताना उमेदवाराचं वय हे 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विषयातील पदवीधर (किमान तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम) सर्व पेपर्समध्ये एकूण किमान 60% गुणांसह आणि 10+2 स्तरावर गणित आणि भौतिकशास्त्र उत्तीर्ण किंवा BE/B.Tech केलं असणं आवश्यक आहे. कोणती पात्रता आवश्यक 10+2 मध्ये गणित आणि भौतिकशास्त्रात प्रत्येकी किमान 50% गुण असणे आवश्यक आहे. किमान 60% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांची विभाग A आणि B परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा असोसिएट मेंबरशिप ऑफ इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स (इंडिया) किंवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया. अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. परंतु AFSB चाचणीच्या वेळी त्यांच्याकडे कोणताही अनुशेष नसावा आणि त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या तारखेनुसार विद्यापीठाने जारी केलेले पदवी प्रमाणपत्र सादर केले पाहिजे. 10वी उत्तीर्णांना सैन्यात नोकरीची मोठी संधी! ITBP मध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती

कसा असतो AFCAT परीक्षेचा पॅटर्न (Exam pattern for AFCAT Exam)

या परीक्षेत एकूण 100 प्रश्न असतात. जे सोडवण्यासाठी उमेदवारांना 2 तासांचा अवधी देण्यात येतो. हा पेपर 300 गुणांचा आहे, म्हणजे जर तुम्ही 1 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर तुम्हाला 3 गुण मिळतील. या परीक्षेत 1/3 निगेटिव्ह मार्किंग देखील असते, त्यामुळे ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत आहेत अशाच प्रश्नांची उत्तरे देण्याची विशेष काळजी घ्या आणि एलिमिनेशन पद्धत वापरा ज्याद्वारे तुम्ही योग्य उत्तर शोधू शकाल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या