कॉलेजची प्राधान्य लिस्ट
मुंबई, 18 जून: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यात अकरावी प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया (Class 11th Online Admission process) सुरू करण्यात आली आहे. यंदा ही प्रवेश प्रक्रया दोन टप्प्यांमध्ये घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच निकालाआधी विद्यार्थ्यांना त्यांची माहिती भरून नोंदणी करायची आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणेजच भाग-I 30 मे पासून सुरू झाला आहे. या तारखेपासून 11 वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी (Class 11th Online Admission) सुरू करू शकत होते. तसेच दहावीचा निकाल (Class 10 Results) जाहीर झाल्यानंतर या अर्जाचा दुसरा टप्पा म्हणजेच भाग-II भरता येणार होता. त्यानुसार आता निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. त्यानुसार पुणे आणि इतर शहरांमध्येही दुसरा टप्पा सरू झाला आहे. MH 11th Admissions: अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलीत ना? मग दुसऱ्या टप्प्याची सुरु करा तयारी; इथे मिळतील Links ‘इंडियन एक्सप्रेस’ नं दिलेल्या माहिती नुसार पुढील आठवड्यापासून, विद्यार्थी प्रथम वर्ष ज्युनियर कॉलेज (FYJC) प्रवेशासाठी त्यांच्या कॉलेजची निवड आणि अभ्यासक्रम सूचित करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरू शकणार आहेत. म्हणजेच विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना कोणतं कॉलेज हवंय याबाबत कॉलेजची प्राधान्य लिस्ट देऊ शकणार आहेत. अकरावीच्या प्रवेश [प्रक्रिया फॉर्मचा भाग 2, ज्याला प्राधान्य फॉर्म असेही संबोधले जाते, जेथे उमेदवारांना प्राधान्यक्रमानुसार कॉलेजेस आणि अभ्यासक्रमांची नावे भरायची आहेत पुढील आठवड्यापासून ही सर्व प्रोसेस सुरु हणार आहे. Career After 10th: दहावीनंतर Polytechnic की 12वी? तुमच्यासाठी हा असेल शिक्षणाचा बेस्ट पर्याय असा असेल प्रवेशाचा दुसरा टप्पा संबंधित अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये होणार आहे. या प्रक्रियेसाठी नोंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना जिथे त्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा महाविद्यालयांची प्राधान्य यादी द्यावी लागेल. या प्राधान्य फॉर्ममध्ये किमान एक आणि जास्तीत जास्त 10 महाविद्यालयांची नावे भरता येतील. विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे.