नवी दिल्ली, 1 जुलै : देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात सातत्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे (Corona) लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लावल्याने अनेकांच्या रोजगार आणि नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे. त्यातच सातत्याने इंधन दरवाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचं बजेट पुरतं कोलमडून गेलं आहे. या पार्श्वभूमीवर कार चालकांना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्याची अर्थिक स्थिती आणि इंधन दरवाढ पाहता आपली कार (Car) अधिक मायलेज (Mileage) कशी देईल, याकडे अनेक कारचालक लक्ष देताना दिसत आहेत. यावर पर्याय म्हणून काही कारचालक इलेक्ट्रिक कार (Electric Car) खरेदी करण्याचा विचार करत आहेत. अनेकांना कारच्या कमी मायलेजचा प्रश्न भेडसावत आहे. या स्थितीत काही जण इलेक्ट्रिक कारकडे आकर्षित होताना दिसत आहेत, तर काही जण आहे त्या कारचं मायलेज कसं वाढेल, यासाठी प्रयत्नशील आहेत. काही सोप्या टिप्स फॉलो केल्या, तर तुम्हीसुध्दा तुमच्या कारचं मायलेज वाढू शकता. या टिप्समुळे तुमच्या कारचं मायलेज 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकतं. कार बंपर क्रॅश गार्ड - लोकं आपली कार शानदार दिसावी यासाठी कारमध्ये अवजड पार्ट्स बसवतात. कारच्या फ्रंटला हेवी प्रोटेक्शन ग्रील (Heavy Protection Grill) लावल्याने आपल्या कारचं नुकसान टळतं. परंतु, याचा परिणाम कारच्या मायलेजवर होतो. तसंच हेवी प्रोटेक्शन ग्रील लावल्याने कारमधील एअर बॅग (AirBag) खोलण्यात अडचणी येऊ शकतात.
कस्टमाईज्ड टायर्स - अनेकदा युजर्स कारला कंपनीने फिटींग केलेले टायर्स (Tyres) काढून अत्याधुनिक अवजड टायर्स बसवतात. यामुळे कारमधील इंजिनवरील दबाव वाढतो आणि त्याच थेट परिणाम मायलेजवर होतो. कंपनीने फिटींग केलेले टायर्स अत्याधुनिक अवजड टायर्सच्या तुलनेत कमी रुंद आणि वजनाला हलके असतात. त्यामुळे मायलेज चांगलं मिळण्यास मदत होते. स्पॉईलर - स्पोर्ट्स कारमध्ये स्पॉईलरचा (Spoilers) वापर प्रामुख्याने होतो. स्पॉईलरचा वापर केल्याने कार वेगात चालवली तर तिचा बॅलन्स कायम राहतो. परंतु, जर तुम्ही तुमच्या साध्या कारमध्ये स्पॉईलरचा वापर केला, तर कारच्या एरोडायनॅमिक डिझाईनवर (Aerodynamic Design) वाईट परिणाम होतो आणि कार कमी मायलेज देऊ लागते.
हेवी रूफ रेल्स - मोठ्या कारमध्ये अनेकदा हेवी रूफ रेल्स (Heavy Roof Rails) पाहायला मिळतात. व्यावसायिक स्वरुपाच्या कारमध्ये जास्त सामान वाहतुकीसाठी याचा वापर केला जातो. परंतु, तुम्ही कोणत्याही छोट्या कारमध्ये हेवी रुफ रेल्सचा वापर करता, तेव्हा कारमधील इंजिनवरचा दबाव वाढतो आणि कार कमी मायलेज देऊ लागते.