जर तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्हाला कोणत्याही संधीची गरज नसते. कारण ज्याच्याकडे कौशल्य असते तो स्वत: परिस्थितीवर मात करत आपले अस्तित्त्व निर्माण करतो. असाच प्रकार बिहारच्या पश्चिम चंपारणच्या एक छोट्या गावात पाहायला मिळाला. याठिकाणी एका तरुणाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भंगारातून ट्रॅक्टर बनवला. विशेष म्हणजे हे डिझेलवर चालत नाही तर पेडलवर चालतो. (आशीष कुमार, प्रतिनिधी)
संजित (28) असे या तरुणाचे नाव आहे. तो धुसवां गावातील रहिवासी आहे. घरात पडलेल्या भंगारातून त्याने अवघ्या 30 दिवसांत एक लहान ट्रॅक्टरच्या आकाराचे वाहन तयार केले आहे. या वाहनाला त्याने मानवी शक्तीने चालणाऱ्या ट्रॅक्टरचे नाव दिले आहे.
विशेष म्हणजे ते चालवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलची गरज नाही. सायकलप्रमाणे त्याला दोन पेडल आहेत. ते फिरवल्यावर ट्रॅक्टर पुढे चालते. संजीतने सांगितले की, या वाहनात 5000 mAh पॉवरची चार्जेबल बॅटरी देखील बसवण्यात आली आहे. यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसवलेले एलईडी बल्ब लागतात.
जेव्हा ट्रॅक्टर चालवला जाईल, तेव्हा डायनॅमो मानवी ऊर्जेचे यांत्रिक उर्जेमध्ये रूपांतर करेल, यामुळे बॅटरी चार्ज होत राहील. आता हा ट्रॅक्टर पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येत आहेत आणि त्यांना तो पसंतीसही पडत असल्याचे त्याने सांगितले.
संजीतने सांगितले की, हा ट्रॅक्टर अगदी सायकलप्रमाणे चालवावा लागतो. त्यामुळे त्यात बसवलेली यंत्रे अडीच ते तीन इंच माती सहज नांगरू शकतात. विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर चालवायला विशेष ताकद लागत नाही.
या ट्रॅक्टरच्या साह्याने शेत नांगरणे हे फावडे वापरून किंवा जनावरांच्या साहाय्याने शेत नांगरण्यापेक्षा कितीतरी पटीने सोपे आणि ऊर्जेची बचत आहे, असा दावा केला जातो.
या ट्रॅक्टरचा वेग ताशी 5 ते 10 किलोमीटर आहे. तुम्ही ते सहजपणे कुठेही नेऊ शकता आणि शेतात नांगरणी करू शकता. याशिवाय तुम्ही यासोबत 600 किलोपर्यंत वजनही वाहून घेऊ शकता.