JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / Whats App : व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठी आनंदाची बातमी! आता कॉन्टॅक्ट एडिट आणि सेव्ह करणं होणार सोपं

Whats App : व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठी आनंदाची बातमी! आता कॉन्टॅक्ट एडिट आणि सेव्ह करणं होणार सोपं

युझर्सची गरज ओळखून व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर्स लाँच करत असतं. लवकरच व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठी एक नवीन फीचर लाँच करणार आहे. हे फीचर युझर्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

जाहिरात

व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठी आनंदाची बातमी! आता कॉन्टॅक्ट एडिट आणि सेव्ह करणं होणार सोपं

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 12 एप्रिल : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी व्हॉट्सअ‍ॅप हे सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून युझर्स फोटो, कंटेंट, व्हिडिओ, ऑडिओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करू शकतात. युझर्सची गरज ओळखून व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर्स लाँच करत असतं. लवकरच व्हॉट्सअ‍ॅप युझर्ससाठी एक नवीन फीचर लाँच करणार आहे. हे फीचर युझर्ससाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे युझरला कॉन्टॅक्ट एडिट आणि सेव्ह करणं सोपं जाणार आहे. सध्या हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या बेटा टेस्टर्ससाठी उपलब्ध असून, लवकरच ते सर्व युझर्ससाठी रोलआउट होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. व्हॉट्सअ‍ॅप सध्या एका नव्या फीचरवर काम करत आहे. लवकरच हे मेसेजिंग अ‍ॅप नवं फीचर लाँच करणार आहे. या फीचरमुळे युझर्सला कॉन्टॅक्ट्स एडिट आणि सेव्ह करणं सोपं होईल. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवीन फीचर सध्या बीटा फेजमध्ये आहे. या फीचरमुळे युझर्सना अ‍ॅपमध्येच नवीन कॉन्टॅक्ट अ‍ॅड करणं आणि संपादित करणं शक्य होणार आहे. सध्या युझर्सना फोनमधले कॉन्टॅक्ट्स अ‍ॅपशी जोडण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या सेटिंग्जचा वापर करावा लागतो. अशा पार्श्वभूमीवर हे नवीन फीचर उपयुक्त ठरेल. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवीन फीचर सध्या केवळ बीटा टेस्टरसाठी उपलब्ध आहे. लवकरच ते सर्व युझर्ससाठी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. जे अ‍ॅड्रॉइड युझर्स हे नवीन फीचर वापरून पाहू इच्छितात, त्यांनी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन बीटा अ‍ॅप डाउनलोड करावं. त्यानंतर New Contacts या ऑप्शनवर टॅप करून हे फीचर उपलब्ध आहे की नाही ते तपासून पाहावं. Wabetainfo ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवीन फीचर सध्या केवळ अँड्रॉइड बीटा टेस्टरसाठी उपलब्ध आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉइड युझर्ससाठी एक बीटा प्रोग्राम असतो. त्या ठिकाणी नवीन फीचर अधिकृतपणे रोलआउट होण्यापूर्वी त्याची चाचणी घेतली जाते. जे युझर्स नवीन फीचर वापरू इच्छितात, त्यांनी त्यांच्या फोनवर व्हॉट्सअ‍ॅप बीटा अ‍ॅपचं लेटेस्ट व्हर्जन अपडेट करून घ्यावं. अहवालानुसार, या नवीन फीचरमुळे युझर्सना अ‍ॅपवरून बाहेर न पडता कॉन्टॅक्ट एडिट किंवा सेव्ह करता येतील. सद्यस्थितीत उपलब्ध असलेली फीचर्स युझर्सना व्हॉट्सअ‍ॅपवरचे कॉन्टॅक्ट सेव्ह करण्यास अनुमती देतं. नवीन फीचरमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे. यामुळे युझर्स नवीन कॉन्टॅक्ट थेट अ‍ॅपवरून सेव्ह किंवा एडिट करू शकतील. तसंच नवीन कॉन्टॅक्ट त्यांच्या फोन किंवा गुगल अकाउंटवर सेव्ह करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या