JOIN US
मराठी बातम्या / ऑटो अँड टेक / टाटानंतर 'या' कंपनीच्या एसयूव्हीला मिळालं सुरक्षिततेच्या बाबतीत 5 स्टार रेटिंग

टाटानंतर 'या' कंपनीच्या एसयूव्हीला मिळालं सुरक्षिततेच्या बाबतीत 5 स्टार रेटिंग

एका कंपनीने अशी एसयूव्ही विकसित केली आहे, जिला उत्तम सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. महत्त्वाचं म्हणजे ती एसयूव्ही भारतातच बनवण्यात आली आहे. ती एसयूव्ही म्हणजे फोक्सवॅगनची तायगुन.

जाहिरात

या कंपनीच्या एसयूव्हीला मिळालं 5 स्टार रेटिंग

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 06 जुलै :  टाटा कंपनीची गाडी म्हटलं की ती मजबूत असणारच, असं एक समीकरण वर्षानुवर्षं मनात ठसलेलं आहे. टाटा मोटर्सच्या नेक्सॉन, पंच आणि अल्ट्रोझ यांसारख्या कार्सना क्रॅश टेस्टमध्ये फाइव्ह स्टार रेटिंग मिळालं होतं. त्यानंतर या कार्सवरचा ग्राहकांचा भरवसा वाढत गेला आणि त्या कार्सच्या विक्रीत वाढ झाल्याचंही पाहायला मिळालं. आता आणखी एका कंपनीने अशी एसयूव्ही विकसित केली आहे, जिला उत्तम सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. महत्त्वाचं म्हणजे ती एसयूव्ही भारतातच बनवण्यात आली आहे. ती एसयूव्ही म्हणजे फोक्सवॅगनची तायगुन. फोक्सवॅगनच्या तायगुन या कारला ग्लोबल एनसीएपीमध्ये फाइव्ह स्टार रेटिंग यापूर्वीच मिळालं होतं; मात्र आता त्या कारने लॅटिन एनसीएपीमध्येही फाइव्ह स्टार रेटिंग मिळवलं असून, त्यामुळे सगळ्या कार्सपेक्षा या कारने एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतातच उत्पादित करण्यात आलेली तायगुन ही कार अमेरिकेत निर्यात केली जाणार असून, त्या दृष्टीने त्या कारला सहा एअरबॅग्ज आणि ईएससी यांसारखी सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत. Amazon Prime मेंबरशिप खरेदी करण्याची सुवर्ण संधी! फक्त 149 रुपयांत होईल काम! क्रॅश टेस्टमध्ये तायगुन कारला पॅसेंजर सेफ्टी अर्थात प्रवासी सुरक्षिततेमध्ये 92.47 टक्के गुण मिळाले आहेत. लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 91.84 टक्के, तर पादचारी सुरक्षिततेच्या बाबतीत 55.14 टक्के गुण या कारला मिळाले आहेत. तसंच, सेफ्टी असिस्टमध्ये या कारला 83.28 टक्के गुण मिळाले आहेत. तसंच, या कारला एकंदर फाइव्ह स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. ‘लॅटिन एनसीएपी’नुसार तायगुन ही एक खूप सुरक्षित आणि विश्वासार्ह कार म्हणून पुढे आली आहे. कारच्या टेस्टच्या वेळी फ्रंट इम्पॅक्ट, साइड इम्पॅक्ट, साइड पोल इम्पॅक्ट, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग अशा वेगवेगळ्या चाचण्यांमध्ये या कारची कामगिरी चांगली असल्याचं दिसून आलं आहे. क्रॅश टेस्टच्या रिपोर्टनंतर ‘स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया’चे एमडी आणि सीईओ पीयूष अरोरा यांनी सांगितलं, की ‘नागरिकांची सुरक्षितता या बाबीला आम्ही प्राधान्य देतो. आमच्या वाहनांच्या सुरक्षिततेबाबतच्या ट्रॅक रेकॉर्डबद्दल आम्हाला अभिमान आहे. भारतात तायगुन, वर्टुस, स्कोडा कुशाक, स्कोडा स्लाविया अशी आमच्या कंपनीची सर्व 2.0 लिटर मॉडेल्स खूप सुरक्षित आहेत. सर्व गाड्यांना प्रवासी सुरक्षिततेच्या बाबतीत ग्लोबल एनसीएपीकडून 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या सर्व कार्सचं उत्पादन भारतातच झालं आहे. या सर्व कार्स भारतात तयार झालेल्यापैकी सर्वांत सुरक्षित कार्स आहेत.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या